पत्रकार धनंजय सोळुंके यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.प्रमोद दुथडे फाऊंडेशन च्यावतीने नांदेड येथील मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे ब्युरो प्रमुख धनंजय सोळुंके यांना शांतीदुत जीवन पुरस्कार-2024 जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळ्याचा कार्यक्रम दि.2 जून रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे डॉ.प्रमोद दुथडे फाऊंडेशन प्रत्येक वर्षी शांतीदुत जीवन पुरस्कार प्रदान करत असते. त्यामध्ये कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, सुनिल वाकेकर, प्रादेशिक व्यवस्थापक वसंतराव नाईक महामंडळ दत्ता सागळे, मोहनदादा मस्के, पार्वतीबाई मोतीराम दुथडे, सुभद्रबाई संपतराव साबळे, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे यांना आप-आपल्या क्षेत्रातील कामगिरीसाठी हा जीवन गौरव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. नांदेड येथील पत्रकार तथा मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे ब्युरो चिफ धनंयज सोळुंके यांना पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, शेती, शेतमजुर, उपेक्षीत, दिनदुबळ्या घटकांना बातम्यांच्या माध्यमातून दखल घेवून त्यांना न्याय मिळून दिल्याबद्दल हा पुरस्कार धनंजय सोळुंके यांना मिळाला आहे.
दि.2 जून रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या गेटसमोर डॉ.प्रमोद दुथडे फाऊंडेशन आणि मानवउध्दार परिवर्तन ज्ञान साधना यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बुध्द आणि भिम गितांचा महामुकाबला होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी अभियंता अशोक येरेकर हे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष पार्वती हॉस्पीटल छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.प्रमोददादा दुथडे आहेत. या कार्यक्रमात शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, आरोग्य उपसंचालक डॉ.भूषणकुमार रामटेके, मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली चव्हाण आणि डॉ.सुरेश हरबडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 2 जून रोजी हा धम्म पहाट कार्यक्रम सकाळी 7 ते 12 या वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटसमोर होणार आहे.
या कार्यक्रमात जनतेने बहुसंख्यत उपस्थित राहण्याचे आवाहन जितेंद्र आदमाने, हेमा भवरे, प्रा.संगिता देहरे, विनोद दुथडे, दिलीप पंडीत, सय्यद नसिर, राजू जावळे, भरत रगडे, सुनिल भालेराव, सतिश मस्के, अजित लांडगे, सय्यद समीर, देवानंद पवार, संजय वाघमारे, रोहित जावळे, दिशा मोकले, पुनम बनकर, शशिकला जाधव, कविता बनकर, शोभा सरोदे, मैना गडकरी, आम्रपाली भोेळे आणि वैशाली सावळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *