नांदेड(प्रतिनिधी)-काल अंबीकानगरमध्ये खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून झालेल्या आत्महत्येप्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सुधाकर मुकूंदराव येवतीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा समीर सुधाकर येवतीकर (42) हा आवळा व्यवसायीक होता. दि.22 मे रोजी तो सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान घरी असतांना गळफास घेवून आत्महत्या करून घेतल्यानंतर त्यांनी पाहिले. त्याने एक सुसाईड नोट लिहुन ठेवले आहे. त्यामध्ये व्याजाच्या पैसाच्या कारणावरून सतत मानसिक त्रास देवून तुझ्यावर खोटी केस करतो, जिवे मारून टाकतो अशा धमक्या देत जुलूमाने समीर येवतीकरकडून जास्तीची रक्कम ती व्याजाची मागत होते. याच त्रासाला कंटाळून छताच्या लोखंडी हुकला दोरीने गळफास घेवून त्याने आत्महत्या केली आहे. समीर येवतीकरच्या आत्महत्येस त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटप्रमाणे दिपक सुभाष पाटील, संदीप ढगे उर्फ हेमंत, दयानंद विभुते असे तिघे जण जबाबदार आहेत.
भाग्यनगर पोलीसांनी या तक्रारीवरुन भरतीय दंड संहितेच्या कलम 306, 385, 504, 506, 34 आणि सोबत महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा क्रमांंक 214/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रकाश कुकडे यांच्याकडे देण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नव्हती.
संबंधित बातमी…..