राज्य माहिती आयुक्तांची तीव्र नाराजी; इतके दिवस संचिका सापडत नसताना गुन्हा का दाखल केला नाही? प्रशासनाला जाब नांदेड (प्रतिनिधी) -महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब समोर आली असून, महत्त्वाच्या काही संचिका गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नांदेड नगरीचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी महापालिकेतील गुंडेवारी विभागाशी संबंधित काही कागदपत्रांची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मागितली होती. मात्र संबंधित संचिका उपलब्ध नसल्याचे उत्तर जनमाहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या उत्तराने समाधान न झाल्याने पांढरे यांनी राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील दाखल केले होते. दरम्यान, नांदेड येथे सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान जनमाहिती अधिकाऱ्यांनी संबंधित संचिका गहाळ झाल्याची माहिती दिली. यावर राज्य माहिती आयुक्त इंदलकर यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, इतक्या दिवसांपासून संचिका सापडत नसताना याबाबत पोलिसांत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? असा थेट सवाल उपस्थित केला.या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरू असून गहाळ संचिका तातडीने शोधून काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संचिका सापडल्या नाहीत तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 987 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पाकिस्थानच्या एअर स्ट्राईकला अफगाणिस्तानने दिले जोरदार प्रतिउत्तर १७० दिवस देशद्रोही… आणि अचानक निरपराध? सोनम वांगचुक प्रकरणाने सरकारला विचारलेले अस्वस्थ करणारे प्रश्न