*वाजेगाव महसूल मंडळात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न* नांदेड :- महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्याप अनुषंगाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान”राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर लोकांची कामे व्हावीत यादृष्टीने या शिबीराचे आयोजन करण्यात करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबीराचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. वाजेगांव मंडळा अंतर्गत वाजेगाव येथील राष्ट्रमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नुकतेच तहसिल कार्यालय नांदेड यांच्यावतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास तहसिलदार संजय वारकड, कृषी पर्यवेक्षक चुंचूवार, शाळेचे मुख्याध्यापक क्षिरसागर, सरपंच जमील शेठ, रविकांत तारू, नायब तहसिलदार स्वप्नील दिगलवार आदी उपस्थित होते. क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी लवकर निकाली काढणे हे या शिबीरांच्या माध्यमातुन सुलभ होणार आहे असे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले. यांनी सामाजिक न्यायविभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्या वा तसेच राशनकार्ड, पुरवठा विषयक, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान आदीचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करावी असे आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी वाजेगावचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी रेखा मंडगीलवार, एम.के.पाटील, दिलीप पवार, कृषी सहायक सुरेखा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महसूल विभागाचे माधव मोरे, प्रतिभा मारतळेकर, दिपाली पवार, संतोष वाघमारे आदींनी विविध योजनांची माहिती देवून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला. कार्यक्रमास वाजेगाव महसूल मंडळातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 1,558 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कंधार व मुखेड येथे वसतीगृह सुरु;ऑफलाईन अर्ज प्राप्त करुन घेण्याचे आवाहन