नांदेड(प्रतिनिधी) -नांदेड ग्रामीण पोलीसांनी 21 मे रोजी एका पिकऍप वाहनात नेण्यात येणारे गोवंश जातीचे दहा गोरे जप्त केले आहेत. या गोऱ्यांची किंमत 1 लाख 83 हजार रुपये दाखविण्यात आली आहे. पोलीस अंमलदार माधव गणपती माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 मे रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास मिलतनगर, मिठ कारखान्यासमोर त्यांनी आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी एम.एच.26 बी.ई.5322 हे बोलोरो पिकऍप वाहन तपासले. त्यामध्ये गोवंश जातीचे दहा बैल(गोरे) बांधून निर्दयीपणे डांबलेेले होते. नांदेड ग्रामीण पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम प्रमाणे शेख साजेद शेख महेबुब (21), रा.अर्धापूर, अब्दुल रज्जाक मौला कुरेशी रा.नईअबादी अर्धापूर तसेच बैल खरेदी करणारा आणि बैल विक्री करणारा अशा लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक 404/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार तेलंगे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,054 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर पोलीसांनी 22 गोवंश भरलेला ट्रक पकडला; तीन बैल मरण पावले होते मिडीया ट्रायल जिंकले आणि विधीसंघर्ष बालकाचा जामीन रद्द