सेवानिवृत्त एएसआयवर संतोष हंबर्डेने केला जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक (एएसआय)च्या गाडीवर दगडफेकून गाडीचा काच फोडण्याचा प्रकार विष्णुपूरी येथील नामावंत व्यक्ती संतोष हंबर्डे याने घडविला आहे.

सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नागोराव कदम (61) रा.विष्णुपूरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या गाडी क्रमांक एम.एच.26 सी.ई.0026 मध्ये बसून दि.20 मे रोजी सायंकाळी 7 वाजता विष्णुपूरी येथील नरसिंह मंदिराजवळून गावात जात असतांना तेथे संतोष हंबर्डे हा युवक हातात खंजीर घेवून त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना जिवे मारण्याच्या उद्देशाने समोर आला. गाडीची गती वाढविल्यामुळे त्याने केलेला खंजीरचा वार गाडीच्या मागच्या बाजूवर लागला. कार पुढे गेल्यावर त्याने हातात दगड घेवून मागील काच फोडून 5 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 504, 336, 427 आणि हत्यार कायद्या कलम 4/25 नुसार क्रमांक 401/2024 वर दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक मठवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *