भाग्यनगर पोलीसांनी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले;5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 111 ग्रॅम सोन्याचे दागिणे व इतर ऐवज जप्त केला आहे.

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन 2024 मध्ये घडलेले चोरीचे अनेक गुन्हे तपासावरच होते. या दरम्यान भाग्यनगर पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मालेगाव येथून रमेश सुरेश गायकवाड(34) रा.गणेशपुर ता.वसमत जि.हिंगोली तसेच सतनामसिंग गुरूमुखसिंग चव्हाण(30) रा.नवा मोंढा वसमत जि.हिंगोली यांना ताब्यात घेवून विचारणा केली असता त्यांनी आपला एक साथीदार संतराम उर्फ पिंट्या रघुनाथ सरोदे रा.तलाबगल्ली अर्धापूर अशा तिघांनी मिळून तिन चोऱ्या केल्याचे कबुल केले. त्यामुळे भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हा क्रमांक 82 आणि 138 उघडकीस आले आहेत. या दोन चोरीच्या घटनांमध्ये चोरीला गेलेल्या ऐवजापैकी पोलीसांनी या दोन चोरट्यांकडून 111 ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि इतर ऐवज असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम. यांनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक रमेश वाघ, प्रभारी पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख, पोलीस अंमलदार दिलीप राठोड, गजानन किडे, प्रदीप गर्दनमारे, ओमप्रकाश कवडे, हनवता कदम, सतिश कदम, सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *