मोटार सायकल आडवून मोबाईल लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर ते भोकर रस्त्यावर अज्ञातांनी प्रल्हाद मिरासे व त्यांचे साथीदार हिमायतनगरकडून भोकरकडे जात असतांना अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या मित्राजवळ असणारे दोन मोबाईल फोन किंमत 22 हजार रुपये व रोख 13 हजार रुपये असा एकूण 35 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना दि.17 मे रात्री 8 ते 9 दरम्यान घडली असून याबाबत प्रल्हाद मिरासे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 35/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 341, 34 भादवीप्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कदम हे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत भाग्यनगर हद्दीतील 17 मे रोजीच्या रात्री 12.30 ते 1 वाजेच्यादरम्यान बी.के.हॉल इन्फीनिटी स्टडी पॉईंट येथील सुहास बालाजी सरपाते (18) या विद्यार्थ्याच्या काळ्या रंगाच्या बॅगमधील ऍपल कंपनीचा आय पॅड, तीन चार्ज, एअर बर्ड तसेच पुस्तके असा एकूण 22 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या असल्याची तक्रार भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून गुन्हा क्रमांक 205/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार वसमतकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *