अंदाजे 19 लाख रुपये भरलेले एटीएम मशीन चोरट्याने चोरले 

 

बारड,(प्रतिनिधी)-गावातील महाराष्ट्र बँकेचे अंदाजे 19 लाख रुपये रक्कम असलेले एटीएम मशीनच चोरट्यांनी उचलून नेले आहे. चोरट्यांनी अगोदर सीसीटीव्ही फोडला आहे. त्यामुळे आतापर्यंत तरी काही क्लू मिळाला नाही. पण पोलीस विविध मार्गावरील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासून यांचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे.

आजचा सूर्योदय होण्याअगोदर बारड गावातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी उचलून नेले आहे. पोलिसांना त्या ठिकाणी एक मोठी दोरी आणि पोते सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.ठसे तज्ञ, श्वानपथक यांना सुद्धा बोलावण्यात आले पण आज आता दुपारपर्यंत काय प्रगती झाली नाही.

पोलीस विभाग बारड कडून जवळ राज्य सोडण्यासाठी तेलंगाणाच आहे.त्या मार्गावरची सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.सोबतच इतर मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासून चोरट्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे प्राप्त माहितीनुसार या एटीएम मशीन मध्ये जवळपास 19 लाख रुपये होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *