न्यायालयातून लॅपटॉप संगणक चोरीला गेला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरून 1 लाख रुपयांचा लॅपटॉप संगणक चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयात सर्वत्र सीसीटीव्ही लावलेले आहेत.
महेंद्र केशवराव आवटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 15 मे रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास जिल्हा न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरील कक्ष क्रमांक3 मध्ये काम करत बसले असतांना त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी बोलावले. त्यानुसार ते तेथे गेले. पण लॅपटॉप संगणक त्यांनी आपल्याच टेबलवर ठेवला होता. परत आले तेंव्हा संगणक कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. लॅपटॉप संगणकाची किंमत 1 लाख रुपये आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार गुन्हा क्रमांक 224/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *