नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने दोन व्यक्तींना पकडून त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड यांनी मिळवेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींकडे संशयीत प्रकारच्या दुचाकी गाड्या आहेत. ते बुध्दभूषण लक्ष्मण शिकारे (30) रा.जयनगर ता.वसमत जि.परभणी आणि साहेबराव मरीबा कांबळे (35) रा.सांगवी उमर ता.देगलूर जि.नांदेड यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी चोरलेल्या दोन गाड्यांपैकी एक गुन्हा हिंगोली शहर पोलीस ठाण्यात क्रमांक 557/2022 प्रमाणे दाखल आहे. तसेच दुसरा गुन्हा क्रमांक 345/2022 नुसार वजिराबाद नांदेड पोलीस ठाण्यात दाखल आहे. वजिराबाद येथून चोरीला गेलेल्या दुचाकीचा क्रमांक एम.एच.26 ए.जे.4884 असा आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दुचाकी गाडीचा क्रमांक एम.एच.38 क्यु.7982 असा आहे. या दोन्ही गाड्यांची किंमत 57 हजार रुपये आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पेालीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार मोतीराम पवार, मारोती मोरे, धम्मानंद जाधव, गंगाधर घुगे, सायबर सेलचे पोलीस अंमलदार राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी पार पाडली.