टायर फुटल्यामुळे दोघांना जलसमाधी

नांदेड (प्रतिनिधी)-टायर फुटल्याने भरधाव क्रूझर जीप पुलावरून गोदावरी नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत जीपमधील दोघांना जलसमाधी मिळाली. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी 5 ते 6च्या सुमारास येळी- महाटीच्या पुलावर घडली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृतांमध्ये जीपचालक आणखी एका युवकाचा समावेश आहे.

ही क्रूझर जीप शिखाचीवाडी (ता. मुदखेड) येथील असून, शिखाचीवाडी येथील जीपचालक आणि येळी (ता. लोहा) येथील युवक चिलपिंपरी येथे बोळवण सोडून शुक्रवारी सायंकाळी येळीकडे निघाले होते. भरधाव वेगातील ही क्रूझर जीप येळी-महाटीच्या पुलावर आली असता अचानक टायर फुटले आणि जीप क्रमांक mh26 bq 2061 पुलावरून गोदावरी नदीत कोसळली. यात थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे (25)रा.येळी ,उद्धव आनंदराव खानसोले (30)रा.शिकाची वाडी यांचा मृत्यू झाल्याच्या समजते.

या घटनेचे वृत्त समजताच नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत जीपचालक आणि त्याच्यासोबतच्या युवकाचा मृत्यू झाला. तसेच क्रूझर जीपचेही नुकसान झाले. या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *