पंकजनगरमध्ये घरफोडून 3 लाख 90 हजारांची चोरी; मुखेड बसस्थानकावर 66 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पंकजनगर धनेगाव येथे घरातील मंडळी दवाखान्यात आहेत अशी संधी साधून चोरट्यांनी एक घरफोडून 3 लाख 90 हजारांची चोरी केली आहे. तसेच मुखेड बसस्थानकावर बसमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेच्या बॅगमधून 66 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.
सौ.मिरा अरुण देशपांडे रा.पंकजनगर धनेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 मेच्या रात्री 8 ते 6 मेच्या दुपारी 1 वाजेदरम्यान त्यांचे पती अरुण देशपांडे हे आजारी असल्याने दवाखान्यात ऍडमीट होते आणि त्या सुध्दा तिकडेच होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या कंपाऊंट वॉलवरून घरात प्रवेश केला आणि घराचे मागील दार तोडून सोन्या-चांदीचे दागिणे 2 लाख 90 हजार 634 रुपयांचे आणि 1 लाख रुपये रोख रक्कम असा 3 लाख 90 हजार 634 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक जामोदकर अधिक तपास करीत आहेत.
देवराव केशवराव जाधव रा.कोल्हारी ता.किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 मे रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास मुखेड बसस्थानकावर ते आणि त्यांची पत्नी मुखेड-नांदेड बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतांना गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या बॅगमधील 66 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरले आहेत. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कदम हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *