नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा उपविभाग येथील पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने एका युवकाला पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे पकडली आहेत. सोबतच काही चोरीचे गुन्हे याच आरोपीने केले आहेत. ही बाब त्याला पकडल्यानंतर समोर आली आहे.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या आदेशानुसार इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे आदींनी मामा चौक पाटी जवळून हरीष उर्फ हऱ्या देविदास शर्मा(23) रा.गोवर्धनघाट पुलाच्याखाली यास पकडले. त्याच्याकडे एक गावठी पिस्तुुल आणि तीन जीवंत काडतुसे सापडली. सोबतच हरीष उर्फ हऱ्या देविदास शर्माने काही महिन्यापुर्वी मंत्रीनगर येथील जागृत हनुमान मंदिराजवळ चैन स्नेचिंग केली आहे. तसेच भाग्यनगर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या केल्या आहेत. ही बाब सुध्दा उघडकीस आली. त्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरी गेलेला ऐवज पोलीसांनी जप्त केलेला आहे. हरीष शर्माकडून पोलीसांनी 1 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.