ग्रामीण रुगणालय भोकर येथे डायलिसिस सेवा सुरु 

भोकर(प्रतिनिधि) – ग्रामीण भागातील डायलिसिस रुग्ण यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालययात डायलिसिस सेवा मिळावी या उद्देशाने नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनानुसार व डॉ. प्रताप चव्हाण, वैद्यकिय अधिक्षक यांच्या नियोजनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज भोकर शहरातील डायलिसिस रुग्ण यांना सेवा देवून सुरू करण्यात आले. डायलिसिस रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे डॉ प्रताप चव्हाण यांनी सांगितले.

डायलिसिस विभाग वैद्यकिय अधिकारी डॉ मंगेश पवळे, डायलिसिस तंत्रज्ञ शंकर अवटे, अधिपरीचारीका राजश्री ब्राम्हणे, निलोफर पठाण, संगीता महादले, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, आरोग्य निरिक्षक सत्यजीत टिप्रेसवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, अत्रीनंदन पांचाळ, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख, लिपिक प्रल्हाद होळगे, प्रकाश सर्जे, शिंदे व रुग्ण यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *