95 हजारांची चोरी; 70 हजारांची जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 95 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डी.जे. चालकाला लुटण्यात आले आहे. त्याच्याकडून 70 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरुन नेण्यात आला आहे.
योगेश नारायदास मालु यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.22 एप्रिलच्या रात्री 3.30 ते 5 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्याने त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश केला. दिवाणच्याखाली ठेवलेले 50 हजार रुपये रोख रक्कम, सोन्याच्या एक तोळ्याचा तुकडा 32 हजार रुपयांचा आणि लॅपटॉप 10 हजार रुपयांचे आणि ईसीआर 3 हजार रुपयांचे असा एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे अधिक तपास करीत आहेत.
मुरूंबा ता.वसमत येथील डी.जे.चालक माणिक गोविंदराव वारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.23 एप्रिलच्या मध्यरात्री ते आपल्या गावाकडून नांदेडकडे येत असतांना नावाडे पेट्रोल पंपाजवळ त्यांची गाडी क्रमांक एम.एच.38 ए.एफ.3628 वर बसून तिघे जण पोचले तेंव्हा एक दुसरी मोटारसायकल आली आणि त्याने गाडी आडवी-तिडवी चालवून वारेला आपली गाडी थांबविण्यास भाग पाडले. त्या दुचाकीवर तिन जण होते. वारे सोबत असलेले संदेश आणि राहुल यांना चाकु व लायटर सारखे वस्तु दाखवून वारे जवळील 70 हजार रुपये रोख रक्कमेचा एकूण ऐवज बळजबरी चोरून नेला. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक चिट्टमपल्ले अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *