निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तरंग सेवाभावी संस्थेचे मतदाता जागरूकता अभियान

नांदेड-येथील सप्तरंग सेवाभावी संस्था विविध उपक्रमाने ओळखली जाते या संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सदिच्छा दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर मतदाता जागरूकता अभियान व मतदाता स्वाक्षरी अभियान राबवण्यात आला. सदरील अभियाना अंतर्गत संस्थेचे विविध पदाधिकारी नांदेड शहरातील विविध वस्तीत जाऊन मतदाता जागरुकतेच काम करत असून प्रत्येक घरी मी मतदान करणार हे स्टिकर देऊन शपथ घेण्यासाठी प्रेरित करत आहेत की आपण मतदान नक्की करणार. यासोबतच आपण शपथ घेतल्यानंतर मतदाता स्वाक्षरी अभियान अंतर्गत मतदाताचे स्वाक्षरीने हमी देत त्यांना शपथ देत आहेत की आम्ही नक्की मतदान करणार. नांदेड शहरातील विविध भागातील नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपण मतदान करण्याचे हमी देत आहेत यासोबत त्यांनी विविध तृतीय पंथांना देखील या मोहिमेत सामील करून घेतलं या नवीन असा उपक्रमाने युवकांमध्ये व गरीब वस्तीत खूप जोश पाहायला मिळालं.

 

संस्थेचे अध्यक्ष डॉ.सान्वी जेठवाणी यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतः मतदान करून इतरांना प्रेरित करण्याचं काम करावं याच हेतूने आपण हे मोहीम राबवत असल्याचे सर्व पत्रकारांना सांगितले. अनेक भागात लोक मतदानाविषयी उदासीन आहेत तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम अशा मोहिमेने होत आहे असं देखील त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *