नांदेड(प्रतिनिधी)-2014 नंतर सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदीने हळूहळू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दुर-दुर करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच मोहन भागवत यांना मोदीला भेटायला बोलवायची वेळ आली. यावरून मोदी ज्या संघामुळे पंतप्रधान झाला. त्या संघाचाच झाला नाही तर आमचा-तुमचा कसा होईल असा प्रश्न उभा करत वंचित बहुजन आघाडीचे ऍड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवाहन केले की, तुमचे आमचे भांडण हे परंपरांगत चालले आहे. मोदी तुम्हाला समाप्त करण्यासाठी तयारी करत आहे तर तुम्ही मोदीला समाप्त करण्यासाठी आमची मदत करा असे आवाहन ऍड.आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केले आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड.अविनाश भोसीकर यांच्या प्रचारासाठी नांदेडला आले असतांना ऍड.प्रकाश आंबेडकर हे बोलत होते. या व्यासपीठावर अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ज्या मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधान पद दाखवले. आता त्यांनाच कटविण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. मागील दोन वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मोदी भेटले अशी चर्चा किंवा वृत्त मी वाचले नाही, पाहिले नाही असे कसे घडले मग. कारण मोदी मार्केटींग करण्यामध्ये सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे. अर्थातच त्यांची आपसात बेबनाव झाला आहे हे सिध्द आहे. तेंव्हा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवाहन करतो की, तुमचे आमचे भांडण हे वंशपरंपरागत आहे. थोड्यावेळाकरीता हे भांडण बाजुला ठेवून मोदीचा हिशोब करण्यासाठी आम्ही एकत्र येवून तुम्ही आम्हाला मदत करा. मोदीचा हिशोब आम्ही करून टाकतो. अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवाहन केले.
मोदी मार्केटींग बद्दल बोलतांना आंबेडकर म्हणाले दरवर्षाला एकदा मोदी आपल्या आईला भेटायला जायचे. विमानतळावरून निघाल्यानंतर घरापर्यंत पोहचण्याच्या सर्व प्रवासाचे फोटो प्रसिध्द व्हायचे. घराबाहेरच्या दालनात बसून मोदी आईसोबत बोलायचे. त्यांच्या हाताने काही खायचे, आईचे पाय दाबायचे आणि निघायचे. घरातील इतर मंडळी मागेच उभी दिसायची पण मोदी त्यांना कोणाला बोलत नव्हते. याचे विश्लेषण करतांना आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान निवासस्थानामध्ये एकूण 52 खोल्या आहेत. त्यात एक-एक खोली 400 चौरस फुटाची आहे. त्या पैकी एका खोलीमध्ये त्यांनी आईला का ठेवले नाही. जेणे करून आईचे दर्शन रोज घेता येईल. यावर बोलतांना आंबेडकर म्हणाले की, आपण करत असलेले काळे कृत्य आईला कळू नये म्हणू पंतप्रधान मोदीने आपल्या आईला दिल्लीच्या घरात ठेवले नाही.
मोदी हा मृत्यूचा सौदागर आहे असे बोर्ड कॉंगे्रस पक्षाने सन 2012 च्या निवडणुकीत गुजरात मध्ये लावले होते. परंतू काही काळानंतर कॉंगे्रसलाच त्याची भिती वाटली आणि ते बोर्ड काढण्यात आले. पण आजच्या परिस्थितीत कॉंगे्रसचे ते बोर्ड खरेच होते. कारण अन्न व औषधी प्रशासनाने भारतातील शेकडो औषधांवर कायमची बंदी आणली होती. ज्यामुळे त्या औषध कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. औषध कंपन्यांच्या सुदैवाने काही दिवसातच निवडणुक आली आणि त्या औषध कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांचे निवडणुक बॉन्ड खरेदी केले आणि त्या औषधांना पुन्हा परवानगी मिळाली. या परिस्थितीत नरेंद्र मोदी हा मृत्यूचा सौदागरच आहे असे माझे म्हणणे खोटे नाही. खरे तर ती संधी होती कॉंगे्रसला पण त्यांनी त्यावर उपाय योजना केली नाही.
बेसॉल्ट कंपनी ज्या बेसॉल्ट कंपनीकडून भारतातने रॉफेल विमान खरेदी केले. त्या कंपनीतील दोन जणांना त्यांनी लाच दिली या कारणासाठी शासनाच्या सेवेतून जर्मनी देशाने कायमचे निष्काशीत केले. मग त्यांनी लाच दिली तर घेणारा भारताचाच असेल ना तर तो कोण होता. याचा शोध घेण्यासाठी आवाज उठविण्याची जबाबदारी कॉंगे्रसची होती. कारण बोफोर्स प्रकरणात पंतप्रधान राजीव गांधीवर लाच घेतल्याचा आरोप झाला होता, त्याची चौकशी झाली होती. पण त्यातून काहीच सिध्द झाले नव्हते. तरी पण कॉंगे्रस गप्पच राहिली.
नांदेडमध्ये उमेदवारांची मॅच फिक्सींग झाली आहे की, नाही असा प्रश्न आंबेडकरांनी जनतेला विचारला. परंतू उमेदवारापेक्षा मतदार आणि मोदी असा रंग रंगविला जात आहे. म्हणजे नांदेडचा उमेदवार निवडणुन देण्यासारखा नाही असा त्याचा अर्थ होतो असे आंबेडकर म्हणाले. माझा शब्द म्हणजे गॅरंटी आहे असे मोदी नेहमीच सांगतात.पण आपण शपथ घेतो तेंव्हा आई, वडील, मुलगा, मुलगी यांच्या शपथा घेतो. कारण मेले तर ते मरतील. मोदींच्या गॅरंटीमध्ये ते सांगतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुन्हा आले तरी सुध्दा ते संविधान बदलू शकत नाहीत. 1956 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे त्यांचे परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोदीने हे सांगावे की, मी संविधान बदलणार नाही. असाच एक उल्लेख माजी रक्षामंत्री निर्मला सितारामन यांचे पती प्रभाकरण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा उल्लेख करतांना ऍड.आंबेडकर म्हणाले त्यांनी सांगितले की, यंदाची निवडणुक ही मोदींसाठी शेवटची निवडणुक आहे. कारण यानंतर देशाचा नकाशा असा काही बदलेली की तो आपल्यालाच आपल्या देशाचा नकाशा आहे काय? हे ओळखता येणार नाही. सोबतच काही दिवसांपुर्वी मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2047 चा उल्लेख केला. त्यानुसार आजचे मोदीचे वय आणि 2047 म्हणजे 117 वर्ष वयामध्ये ते पंतप्रधान असतील असे त्यांचे मत आहे. याला काय म्हणाले असा प्रश्न ऍड.आंबेडकरांनी जनतेला विचारला तेंव्हा तो भांग पिलेला असेल असे उत्तर जनतेने दिले. इंग्रजी भाषेत अशा वृत्तीला मॅगलोफिनीया असा आजार म्हणतात असे आंबेडकर म्हणाले.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंगे्रस दोन्ही गट, शिवसेना दोन्ही गट यात कोणत्याही राजकीय पक्षाने गरीब मराठा उमेदवाराला उमेदवारी दिलेलेली नाही. कारण हे सर्व मराठे निजामशाहीचे मराठे आहेत. परंतू वंचित बहुजन आघाडीने पंजाबराव डकसारख्या गरीब मराठा उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभे असलेल्या मराठा समाजाला मी आवाहन करतो की, त्यांनी फुले-शाहु-आंबेडकरांचे राज्य पुन्हा एकदा आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करतांना नांदेड येथील उमेदवार ऍड.अविनाश भोसीकर यांच्या नावासमोर असलेलेल्या शिट्टी या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करावे.
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने आज नांदेड जिल्ह्यातील अनेक नागरीकांनी ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना आर्थिक मदत दिली.