महामानवास अनोखे अभिवादन;मी मतदान करणारच फलकावर अनेक मतदारांनी केल्या स्वाक्षऱ्या

नांदेड:-बोधीसत्व-महामानव-ज्ञानसूर्य-भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 16 नांदेड लोकसभा अंतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदानजागृतीसाठी तालुका स्वीप विभागाच्यावतीने तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आवाहानानुसार विक्रीकर भवन, डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ” मी मतदान करणारच..! ” असा स्वाक्षरी फलक लावण्यात आला आहे.

सर्व युवक, युवती, स्त्री,पुरुष अभिवादनकर्ते मतदार या फलकावर स्वाक्षरी करुन मतदान करण्यासाठी येत्या 26 एप्रिल रोजी सज्ज होत आहेत. या फलकावर जयंतीनिमित्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, नितेशकुमार बोलेलू,नायब तहसीलदार,उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, स्वीप सदस्य संजय भालके, राजेश कुलकर्णी, प्रलोभ कुलकर्णी,बाबुराव जाधव तसेच असंख्य अभिवादनकर्ते यांनी स्वाक्षरी करुन मतदान करणारच ही मतदाराची प्रतिज्ञा घेतली. यावेळी बहुसंख्य उपस्थित मतदारांनी स्वाक्षरी करुन मतदान करण्याचा संकल्प घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *