लक्ष्मीनगरमध्ये 70 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-लक्ष्मीनगर नांदेड येथे बंद असलेले घरफोडून चोरट्यांनी 69 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरला आहे.
अतिख अहेमद अखिल अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 एप्रिलच्या सायंकाळी 5 ते 10 एप्रिलच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान त्यांचे लक्ष्मीनगर येथील घर बंद करून, कुलूप लावून बाहेर गेले होते. यावेळे कोणी तरी चोरट्यांनी तो कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम 40 हजार रुपये, सोन्याची दीड तोळ्याची गलसर 21 हजार रुपयांची, दीड ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट 2 हजार रुपयांचे सोन्याची अंगठी 5 ग्रॅम किंमत 1 हजार रुपये दुसरी अंगठी 5 हजार रुपयांची, चांदीचे वाळे 400 रुपयांचे असा एकूण 69 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *