नांदेड(प्रतिनिधी)-सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा 16 मार्च रोजी झाली. तर त्याची आधीसुचना 28 मार्चपासून लागू करण्यात आली. नांदेड लोकसभेसाठी 74 उमेदवारांनी 92 अर्ज खरेदी केले होते. यापैकी 43 जणांनी माघार घेवून 23 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नांदेड लोकसभेसाठी 74 उमेदवारांनी 92 अर्ज खरेदी केले होते. छाननीत 9 अर्ज अपात्र ठरले. 66 पैकी दि.8 एप्रिल सोमवार रोजी 43 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. यात 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात 3 राष्ट्रीय पक्ष, 7 नोंदणीकृत पक्ष आणि 13 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासाठी 2 बॅल्ट(मशीन) लागणार आहेत. सीव्हील ऍक्टच्या माध्यमातून 48 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील 22 तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर 26 तक्रारी आचार संहितेच्या संदर्भात नसल्यामुळे रद्द करण्यात आल्या. या 22 मशील काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात लोहा पोलीस ठाणे अंतर्गत विनापरवानगी घेण्यात आलेल्या सभेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर काही ठिकाणी नामफलकाच्या संदर्भात तक्रारी होत्या. आचार संहिता जाहीर झाल्यापासून 1 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला. यात 44 लाख रुपये रोख तर 88 लाख रुपयांच्या वस्तु असा जप्त करण्यात आला आहे. याचबरोबर 2150 सोशल मिडीयाचे खाते तपासण्यात आले. यापैकी 4 जणांनाा नोटीसा आणि 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 72 वर्तमान पत्रांची तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिली.
उमेदवारांना प्रचारापासून कोणीही रोखू शकत नाही अन्यथा गुन्हे दाखल-जिल्हाधिकारी
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. काही ठिकाणी राजकीय उमेदवारांना प्रचार करण्यासाठी गाव बंदी घातली आहे. तर काही जणांना गावातून हाकल जात आहे. पण हे लोकशाहीत मान्य नाही असे करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही कर ण्यात येईल असा इशाराच जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.
जिल्हासह राज्यात उमेदवारांना गावबंदी, गावात प्रवेश न करणे प्रचार न करू देणे अशा घटना घडत आहेत. उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, लोकशाही तंत्रात अशा गोष्टींना आडकाठी घालता येणार नाही. लोकशाहीने ठरवून दिल आहे. कोणत्याही उमेदवाराला आपल्या मतदार संघात कोणत्याही ठिकाणी जाऊन मत मागण्याचा व प्रचार करण्याचा अधिकार घालून दिला आहे. पण या बाबत काही जण उमेदवारांना गावबंदी करत आहेत. घेराव घालत आहेत. गावातून हाकालून दिल जात आहे हे कायदेशीर नाही. अशा बाबतीत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी उमेदवाराला आडकाठी निर्माण केली जाईल. त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन याची तात्काळ अंमलबजावणी करून त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले जातील अशी माहितीही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.