पतीच्या अपघातानंतर पत्नीने घेतला गळफास

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे महावितरण कार्यालयात शासकीय कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अरविंद बेंद्रीकर हे रात्री उशीरा गावाकडे निघाले होते. मांजरम जवळ त्यांचा अपघात झाल्याची माहिती कळताच त्यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजले.
नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे अरविंद उर्फ बाबूराव बेंद्रीकर हे नांदेड येथील विष्णुपूरी येथे महावितरण कार्यालयात कर्मचारी होेते. ते आपल कामकाज आटपून शनिवारी रात्री उशीरा गावाकडे निघाले होते. मांजरपासून काही अंतरावर मोटारसायकलचा अपघात झाला. याा अपघातात ते गंभीर जखमी झाले असता उपचारासाठी नांदेड येथील दवाखानात आणले होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या बाबत त्यांची पत्नी स्नेहल यांना पतीचा अपघात झाला असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पण काही वेळाने त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच. स्नेहल यांनीही आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या दाम्पत्याला एक तीन वर्षाची मुलगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *