ढिसाळ नियोजनाने महाभारत एक्सप्रेसमध्ये घडला राडा; वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांमुळे लोकसभेच्या निवडणुकीत वातावरण बिघडेल काय?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये काल दि.5 एप्रिल रोजी लोकसभेच्या पार्श्र्वभूमीवर सर्वसामान्य जनतेचे मत जाणून घेण्यासाठी घेतलेल्या एका कार्यक्रमात काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्यासोबत हाणामारी केली. या प्रसंगी एक महिला बोलत असतांन वृत्तवाहिनीची अँकर महिला आपल्याला दुसऱ्याला काही सांगायचे नाही असे म्हणून त्या महिलेला गप्प करत होती. पण त्या महिलेच्या झालेल्या बेअबु्र बद्दल संबंधीत वृत्तवाहिनीने काय केले याचा काही मागोवा लागला नाही. ढिसाळ नियोजन या कार्यक्रमात हाणामारीला कारणीभुत झाले आहे असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.
वृत्तवाहिनीने महाभारत एक्सप्रेस या नावाखाली सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्य जनतेचे मत जाणून घेण्यासाठी देशभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. त्यातील महाभारत एक्सप्रेस हा कार्यक्रम काल दि.5 एप्रिल रोजी नांदेड शहरातील मल्टीपर्पज हायस्कुलच्या मैदानावर महाभारत एक्सप्रेस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काही उमेदवार आणि काही उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हजर होते. या कार्यक्रमात कोणताही सर्वसामान्य माणुस हजर नव्हता.
वृत्तवाहिनीच्या एका महिला आणि पुरूष अँकरने या कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यात त्यांनी विद्यमान खासदारांनी काय केले आणि काय अपेक्षा आहेत अशा प्रश्नांनी सुरूवात झाली. यामध्ये काही राजकीय पक्षांच्या लोकांनी दुसऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना शिवीगाळ केल्यामुळे हे प्रकरण चिघळले. दुसऱ्या राजकीय पक्षांच्या लोकांनी शिव्या देणाऱ्यांवर धाव घेतली. त्यांनी सुध्दा प्रतिकार केला आणि याचा परिणाम हाणामारीत झाला.
हे प्रकरण घडल्यानंतर एक महिला कोणाला तरी आपले म्हणणे सांगत होती आणि ऐकणारा ती रेकॉर्डींग करीत होता तेंव्हा महाभारत एक्सप्रेसमधील महिला अँकरने त्या महिलेला सांगितले की, आपल्याला दुसऱ्याला काही सांगायचे नाही. म्हणजे बोलणारी महिला त्या वृत्तवाहिनीची नोकर होती काय? अशी शंका घेण्यास जागा आहे आणि त्या महिलेची जी काही बेअबु्र झाली त्यासंदर्भाने महाभारत एक्सप्रेसच्या वृत्तवाहिनीने काही कायदेशीर कार्यवाही केली काय? याचा शोध घेतला असता त्याचे उत्तर सापडलेच नाही.
वृत्तवाहिनीने सुरूवात करतांना निवडणुकीच्या संदर्भाने सर्वसामान्य माणसांचे मत जाणुन घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे असे सांगितले होते. परंतू प्रत्यक्षात त्या वृत्तवाहिनीच्या स्थानिक प्रतिनिधीने फोन करून-करून काही लोकांना जमवले होते. ती सर्व सामान्य मंडळी नव्हतीच ते कोणत्या तरी राजकीय पक्षाशी जोडलेले होते. त्यामुळे झालेला वाद हा होणारच होता. सर्व सामान्य माणसाच्या नावाखाली काही निवड लोकांच्या सोबत घेण्यात आलेला हा कार्यक्रम म्हणजे त्यात सर्वसामान्य माणसाचे मत कोठून आले. त्यात तर काही निवडक आणि निवडक लोकांचाच समावेश होता. मग याच कार्यक्रमाला सर्वसामान्य जनतेचे मत म्हणायचे काय असाही मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे. अशा पध्दतीचे कार्यक्रम सर्वत्र होत गेले तर वृत्तवाहिनीच्या या कार्यक्रमांमुळे चांगले वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित व्हिडिओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *