नांदेड(प्रतिनिधी)-अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील मोठे प्रस्थ आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून 2019 मध्ये प्रताप पाटील यांना आम्ही मैदानात उतरविल होत. पण आमच्यासमोर एक चिंता होती अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भावना व्यक्त केली. याचबरोबर अशोक चव्हाण आमच्यासोबत याव यासाठी आम्ही अनेकदा प्रयत्न केल. पण त्या प्रयत्नांना अखेर यश आल आज ते आमच्यासोबत आहेत. आता मराठवाडा आणि विदर्भाचे प्रश्न निश्चितच मार्गी लागतील असे ते म्हणाले.
महायुतीच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचा आज उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे, खा.अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. जुना मोंढा येथून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. नंतर ही रॅली गुरुद्वारा मैदान येथे जाहीर सभेत रुपांतर झाली. यावेळी फडणवीस बोलत असतांना म्हणाले की, मोदीजींनी देशाच्या विकासाची गॅरंटी घेतली आहे. देशात गरीब-कल्याणांचा अजेंडा राबवून त्यांनी 25 कोटी कुटूंबांना गरीबीतून बाहेर काढल आहे. मोदीजी मुठभर लोकांसाठी काम करत नाहीत. आज देशात 11 कोटी शौचालय, 20 कोटी पक्के घरे आणि 50 कोटी कुटूंबियांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहचविले आहे. पंतप्रधान मोदींनी विकसीत भारताची गॅरंटी घेतली आहे. 2014-2024 या दहा वर्षाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांवरून 5 व्या क्रमांकावर नेली आहे आणि येणाऱ्या काळात हाच क्रमांक जगात भारत देश हा तिसरा आर्थिक महासत्ता देश म्हणून समोर येणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या 21 मिनिटाच्या भाषणात त्यांनी अनेक विकासाची मुद्दे मांडली आहेत.
यावेळी खा. चिखलीकर यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, मागील पाच वर्षाच्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी मला काम करण्याची संधी मिळाली. या काळात मी 25 ते 30 वर्षापासून प्रलंबित असणारा नांदेड-बिदर रेल्वे महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळवून घेतली. याच बरोबर बोधन-रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण होणार आहे. कोरोनाच्या काळात एक रुपयांचा निधीही मिळू शकला नसला तरी जिल्ह्यातील 2 लाख लोकांना धान्य किट वाटपाचे काम भाजपाच्यावतीने केल आहे. कोराना काळातील खासदारांचा निधीही हा आरोग्य खात्याकडे वळविण्यात आला होता. आता मी एकटा खासदार नाही तर माझ्यासोबत अशोक चव्हाण आणि डॉ.अजित गोपछडे हे आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठे उद्योग आल्याशिवाय राहणार नाहीत. कधी मी स्वप्नातही विचार केला नाही. अशोक चव्हाण आणि मी एका व्यासपीठावर होवू पण ही मोदीजीची जादु आहे.
चिंता होती 2019 मध्ये-देवेंद फडणवीस
