पुस्तकाचा गुत्तेदार आता पत्रकारांचा गुत्तेदार झाला

जिल्हाधिकारी साहेब पत्रकारांचे पॅकेज देणाऱ्यावर कशी नजर ठेवणार?
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी साहेब जाहीराती आणि बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आपण समिती तयार केली. परंतू पत्रकारांचे गुत्तेघेणाऱ्या ऑल इंडियाला आपण कसे रोखणार हा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आला आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत ज्या अर्धवट काळी आणि अर्धवट पांढरी दाढी असलेल्या ऑल इंडियाला कोणी कुत्र विचारत नव्हत त्याचेही आता चांगले दिवस आले आहेत. कॉंगे्रस पक्षाने पत्रकारांची सोय लावण्यासाठी, पत्रकारांचे पॅकेज ठरविण्यासाठी ऑल इंडियाची निवड केली असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. नांदेड जिल्ह्यात मीच राजकारण चालवतो, मीच नेत्यांना शिवकतो, मीच सांगेल त्याला कोणत्याही राजकीय पक्षाचे तिकिट मिळू शकते अशा वल्गना करून-करून काही दारुवाल्यांना हाताशी धरुन रात्रीची सोय कशी होईल यासाठी प्रयत्न करतांना ज्याचे जीवन गेले. सोबतच जेवन करतांना अर्धक आणि लसन जास्त टाकून मटनात पातळ रस्सा द्या अशी मागणी करत असल्यामुळे मुळ मटन खाणाऱ्यांची वाताहत झाली. असा हा महाभाग आता पत्रकारांचा गुत्तेदार झाला आहे. महाराष्ट्रातच्या पत्रकारांच्या शिर्ष संघटनेबद्दल याने काय-काय म्हटले, कोण-कोणत्या पत्रकारांच्या नेत्यांविषय आपले शुभ संदेश प्रसारीत केले होते याचा अजून विसर पडलेला नाही.
कधी काळी माजी मुख्यमंत्री यांनी सुध्दा या ऑल इंडियाला आपल्या हाताचे खेळणे बनवले होते. पण हे खेळणे त्यांचाच खेळ करत आहे हे लक्षात आल्यावर एका जाहीर कार्यक्रमात त्याचे नाव घ्यायचे नाही असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावेळी सर्वांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. आता माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले आहेत. पण इतरांना पुस्तके विकून आपला धंदा चालविणाऱ्या या ऑल इंडियाने आता लोकसभा निवडणुकीमध्ये पत्रकारांचे पॅकेज संभाळण्याची जबाबदारी कॉंगे्रसकडून मिळवली असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. आपल्या गालावर पडणाऱ्या खळीचा उपयोग करून मी कशी काय मारली असा प्रश्न आपल्याच चमच्यांना विचारून त्यावर छदमी हसू हसत आपणच थट्टा करायची आणि आपणच हसायचे अशा प्रकारे चालणारा हा ऑल इंडिया कॉंगे्रस पक्षाचे काम तरी इमानदारीने करेल काय? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. या ऑल इंडियाबद्दल आमचे काका म्हणतात की, “पत्रकारीतेतून कमावण्याचा बांधला मी चंग आहे, वृत्तपत्र असो की, पुस्तक पैश्यांशी नाते अभंग आहे.‘ हे सर्व लिहितांना आमची तयारी पण मोठीच आहे कारण एक विचारवंत म्हणतो,”ए मेरी कलम इतनासा एहसास कर दे, कह ना पाई जुबान तु बयान कर दे..’ या तयारी सोबतच आम्ही हे लिहिले आहे. दुसरा एक विचारवंत म्हणतो, “हम पत्रकार बंदुक की नहीं कलम की मार रखते है। हम इरादों में दम और सोच में गोली की रफ्तार रखते है।’ आम्ही अनेक वेळेस आमच्या लिखाणा मध्ये 1950 कालखंडातील लेखक पत्रकार सआदत हसन मंटो यांचा उल्लेख करत असतो. परंतू ऑल इंडियासाठी या महान व्यक्तीचे शब्द वापरण्याची इच्छा नसतांना सुध्दा त्यांचे वाक्य लिहायची इच्छा आहे. ते म्हणतात की, किंमत कोई भी हो आदमी अगर बिक जाये तो कौडी का नहीं रहता।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *