विवाहितचा खून करून तिचे प्रेत नष्ट करणाऱ्या नवरा आणि सासुला जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2014 मध्ये लग्न झाल्यानंतर सेनापतीच्या मुलीचा खून करणाऱ्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी जन्मठेप आणि 20 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम सेनापतीला देण्याचे आदेश न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी केले आहेत.
सेनापती हरी साबळे या शेतकऱ्याने 8 ऑक्टोबर 2019 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुजगी पार्वती हिचे लग्न सन 2014 मध्ये कोसमेट ता.किनवट येथील दिलीप मारोती कपाटे यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवस संसार चांगला चालला. नंतर मुलगी पार्वती आपले वडील सेनापतीला सांगत होती की, माझा नवरा दिलीप आणि सासू मंजुळाबाई हे दोघे मला तुम्हाला पसंद नाहीस, दिसायला चांगली नाहीस म्हणून नेहमी त्रास देत आहेत. त्यानंतर सेनापती यांनी आपले जावई दिलीप आणि जावयाची आई मंजुळाबाई या दोघांना समजून सांगितले. त्यानंतर पुन्हा संसार चांगला चालू लागला. त्यानंतर पुन्हा तसेच घडू लागले तेंव्हा मी एकदा माझी मुलगी पार्वतीला मदनापूर ता.किनवट येथे आपल्या गावी घेवून आलो. तेथे मुलगी दहा महिने राहिली. या दरम्यान ऍटो खरेदी करण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये घेवून ये असा तगादा मुलीकडे लावण्यात आला होता. त्यासाठी तो तिला मारहाण करत असे आणि नेहमी त्रास देत असे. पण मुलीचा संसार सुखकर चालावा. म्हणून मी प्रयत्नशिल होतो. पण मला पाहिजे तसे यश आले नाही. दि.4 सप्टेंबर 2019 रोजी कोसमेट येथील सरपंच यांचा मला रात्री 11.30 वाजता फोन आला आणि ते मला विचारत होते की तुमची मुलगी पार्वती ही सकाळी 7 वाजल्यापासून घरात नसून ती कोठे तरी निघून गेली आहे, ती तुमच्याकडे आली आहे काय? मी नाही असे सांगितले. त्यानंतर मी आणि सरपंच पोलीस ठाणे ईस्लापूर येथे गेलोत आणि तेथे मिसिंग क्रमांक 5/2019 दाखल केला. माझ्या मुलीचा घातपात झाला असेल असा जबाब मी मिसिंगमध्ये दिला होता.
दि.8 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता गावातील नामदेव भुरके यांनी मला कोसमेट येथून फोनद्वारे माहिती दिली कही, तुमच्या मुलीचे प्रेत कोसमेटजवळी विहिरीत सापडले आहे. मी जाऊन पाहिले तेंव्हा विहिरीतील प्रेत माझ्याच मुलीचे होते हे मी ओळखे त्यानंतर पोलीसांच्या मदतीने मुलगी पार्वतीचे प्रेत विहिरीबाहेर काढले तेंव्हा डॉक्टरांनी तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे असा अहवाल दिला. म्हणून माझी मुलगी पार्वतीचा पती दिलीप आणि सासु मंजुळाबाई कपाटे यांच्याविरुध्द तक्रार आहे. या तक्रारीवरुन ईस्लापूर पोलीसांनी 8 सप्टेंबर 2019 रोजी दिलीप कपाटे आणि त्याची आई मंजुळा कपाटे यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 498(अ), 201 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 51/2019 दाखल करून ईस्लापूरचे पोलीस निरिक्षक आर.बी.कायंदे यांच्याकडे तपास देण्यात आला. आर.बी.कायंदे यांनी मंजुळाबाई आणि त्यांचा मुलगा दिलीप यास अटक करून त्यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात हे प्रकरण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांच्या समक्ष चालले. त्यात सरकार पक्षाच्यावतीने 12 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. एकूण उपलब्ध लेखी आणि तोंडी पुरावा ग्राहय धरून न्यायाधीश मराठे यांनी पार्वतीचा गळा दाबून तिचा खून केल्यानंतर तिचे प्रेत विहिरीत टाकणारा तिचाा नवरा दिलीप कपाटे आणि त्याची आई मंजुळाबाई कपाटे या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची 20 हजार रुपये रक्कम जमा झाल्यानंतर ती रक्कम पार्वतीचे वडील सेनापती साबळे यांना देण्याचे आदेश न्यायाधीश मराठे यांनी दिले आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.यादव तळेगावकर यांनी बाजू मांडली. ईस्लापूरचा पोलीस अंमलदार सविता गिमेकर यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *