जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मोठ्या बांधकामाच्या समोर रस्त्यावर वकिलाने मेव्हण्याला मारहाण केली?

 

नांदेड, (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका वकिलाने आपल्याच मेव्हण्याला घरगुती कारणासाठी रस्त्यावर जबर मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्याला रोखून पोलिसांच्या हवाली केले आहे. पुढील कार्यवाही वृत्तलीपर्यंत पूर्ण झाली नव्हती.

प्राप्त झालेल्या फुटेज नुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन-चार मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचे मोठे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामाच्या समोर रस्त्यावर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला लाकडाने जोरजोरात मारत आहे. मार खाणारा व्यक्ती खाली पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी मारहाण करणाऱ्याला रोखून त्याला ताब्यात घेतले. पुढे जनतेने मारहाण करणाऱ्याला नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात नेले.सोबतच ज्याला मारहाण झाली त्याला दवाखान्यात नेण्यासाठी सोय करा असेही लोक त्या फुटेज मध्ये बोलत आहेत.

वृत्त प्रकाशित करेपर्यंत वजीराबाद पोलीस ठाण्यात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. पोलीस ठाण्यातील लोकांना अद्याप पूर्ण माहितीच नव्हती अशी परिस्थिती आहे.

व्हिडीओ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *