बोलेरो-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नी ठार

नांदेड (प्रतिनिधी)-बोलेरो व एका दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दांपत्याचा मृत्यू झाला. नांदेड- लातूर महामार्गावर विष्णुपुरीजवळ असलेल्या लक्ष्मी पेट्रोलपंपासमोर आज (दि.26) दुपारी दीड वाजता हा अपघात घडला. अपघात घडताच बोलेरोचा वाहनचालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तालुक्यातील मार्कंड येथील रामदास पांचाळ (वय 45) हे पत्नी अल्का पांचाळ समवेत दुचाकीवर जात होते.विष्णुपुरी जवळील श्रीलक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो या चारचाकी वाहनाने पांचाळ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. समोरासमोर घडलेल्या या अपघातात रामदास पांचाळ व अल्का पांचाळ (वय 40) हे जागीच ठार झाले. घटना घडताच बोलेरो वाहनाचा चालक
घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आयलाने व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर बोलेरो वाहनही ताब्यात घेतले. पांचाळ दांपत्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांचेही पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.दरम्यान घटनेची माहिती कळताच मार्कंड गावावर शोककळा पसरली असून पांचाळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *