नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दुचाकी चोरी करणाऱ्या सहा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील 51 दुचाकी जप्त केल्या आहेत. सोबतच अजून दहा दुचाकी आहेत. त्या दुचाकींच्या गुन्ह्याबद्दलची शाहनिशाह होणे शिल्लक आहे. एकूण 61 दुचकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण किंमत 21 लाख 47 हजार रुपये असल्याची माहिती पोलीसांनी आपल्या प्रेसनोटमध्ये दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मार्च रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने किनवट येथे दोन पोलीस पथके पाठवली. त्यानंतर किनवट येथून काही आणि काही नांदेड येथून असे सहा आरोपी पकडण्यात आले. त्यांच्याकडून 61 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील 51 दुचाकी गाड्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरीत दहा दुचाकी बाबत आणि त्या दुचाकी चोरींच्या गुन्ह्यांबाबत शाह-निशाह करणे शिल्लक आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेले सहा दुचाकी चोर बालाजी अभिमान माने (27) रा.भावेश्र्वरनगर चौफाळा नांदेड आणि ह.मु.गोकुंदा किनवट, दिपक सुरेश कोकुरले(23) रा.शनिवारपेठ किनवट, विकास शेषराव शिंदे (23) रा.प्रधानसांगवी किनवट , रमेश शामराव कय्यापाक (38) रा.तरोडा (खु) बेलानगर ह.मु.कोठारी ता.किनवट, राजू दादाराव भगत (24) रा.कोठारी ता.किनवट, शफी फकरोद्दीन सय्यद (23) रा.कोठारी ता.किनवट असे आहेत. या पकडलेल्या चोरट्यांना पुढील तपासासाठी संबंधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, सुरेश घुगे, संजीव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगिरवाड, गजानन बैनवाड, मोतीराम पवार, मारोती मोरे, महेश बडगु, रणधिसिंह राजबन्सी, धम्मा जाधव, गंगाधर घुगे, हनुमानसिंह ठाकूर, ज्वालासिंग बावरी, सायबर सेलचे पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेश्मा पठाण, व्यंकटेश सांगळे यांचे कौतुक केले आहे.
पोलीस अधिक्षक नांदेड यांनी जनतेला आवाहन केले आहे की, मोटार सायकल वाहन तळावर लावतांना आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच कोणी कमी किंमतीत चोरीची मोटारसायकल आपल्याला देत असेल तर त्या बाबत पोलीसांशी संपर्क साधावा.