किनवट तालुक्यातील भंडारवाडी “मधाचे गाव” घोषित 

नांदेड:- किनवट तालुक्यातील भंडारवाडी हे गाव मराठवाड्यातील पहिले व महाराष्ट्रातील चौथे मधाचे गाव म्हणून नावलौकिकास आले आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी दिनांक 12 मार्च 2024 रोजी ही घोषणा केली. मंडळाचा उपक्रम शेती आणि पर्यावरणपूरक असून किनवट तालुक्यातील मौजे भंडारवाडी हे मराठवाड्यातील पहिले मधाचे गाव निर्माण होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने येथे जाहीर केले आहे.

भंडारवाडी ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने मधाचे गाव या कार्याक्रमाचे शुभारंभ सोहळा 12 मार्च 2024 रोजी झाला. या गावातील ग्रामपंचायत आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मंडळाचे सभापती रविंद्र साठे व किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती कावली मेघणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (उद्योग) बिपीन जगताप, तहसिलदार श्रीमती शारदा चौडेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, तालुका कृषी अधिकारी बालाजी मुळे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर, भंडारवाडीचे सरपंच अभिमन्यु गादेवाड व उपसरपंच अमोल केंद्रे, निरीक्षक (मध योजना) डी. व्ही. सुत्रावे, त्याचबरोबर ग्रामसेवक तुपकर व मंडळाचे इतर कर्मचारी आणि ज्ञानेश्वर जेवलेवाड, समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

पंतप्रधानाच्या मधक्रांती आवाहनाला सकरात्मक प्रतिसाद देत भंडारवाडी या गावाला मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एका गावाची निवड तसेच गाव येथे मधपेटीची गरज मंडळाचे सभापती रविंद्रजी साठे यांनी यावेळी सांगितले. या व्यवसायातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारेन तर मधमाशी वाचविण्याच्या चळवळीची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

 

राज्यात मधाचे गाव ही संकल्पना मोठ्याप्रमाणात राबविण्यात येत आहे. मधाचे गाव म्हणून भंडारवाडी या गावाची ओळख निर्माण होणार आहे. या गावात मधुबन आणि मधाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी बिपीज जगतात यांनी दिली. सदरील मधाचे गाव ही संकल्पना रवींद्र साठे सभापतीआणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर विमला, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *