1 कोटी देवून लोह्यात आलो; एस.पी.आणि आय.जी.माझे काही वाकडे करू शकत नाहीत-इतिश्री पोलीस निरिक्षक चिंचोळकर

नांदेड(प्रतिनिधी)-एस.पी.आणि आय.जी. माझे काही वाकडे करणार नाहीत. त्यांना 1 कोटी रुपये देऊन लोह्याला आलो आहे. अशी धमकी देवून एका 35 वर्षीय व्यक्तीला थापड बुक्या आणि बेल्टने मारहाण करतांना प्रसिध्द पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी त्या व्यक्तीला दिलेल्या शिव्या लिहिण्याची ताकत वास्तव न्युज लाईव्हच्या लेखणीत सुध्दा नाही. त्या व्यक्तीविरुध्द 10-12 वर्षापुर्वीचा फेसबुकवरील फोटो शोधून त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा व्यक्ती शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा तालुकाप्रमुख आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांची नियुक्ती झाली होती.या बद्दलची सविस्तर माहिती शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते एकनाथ पवार, दत्ता कोकाटे, बंडू खेडकर, पिडीत तालुकाप्रमुख चंद्रकांत क्षीरसागर, सुनिल कदम, गौरव कोटगिरे आदींनी पत्रकार परिषदेत दिली.


आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार चंद्रकांत मोहनराव क्षीरसागर (35) रा.आडगाव ता.लोहा जि.नांदेड यांनी आज 8 फेबु्रवारी रोजी विशेष पोलीस महानिरिक्षक, मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी, मानव अधिकार संरक्षण, पोलीस अधिक्षक नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड व उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार यांना दिले आहे.
लोहा शहरात सुरू असलेला मटका, दारु आणि गुडगुडी याबद्दल चंद्रकांत क्षीरसागर यांनी 20 फेबु्रवारी 2024 रोजी पोलीस निरिक्षक लोहा यांना निवेदन दिले होते. चंद्रकांतचे दुर्देव की ओमकांतचे सुदैव दि.22 फेबु्रवारी रोजी महिंद्रा फायनान्स कंपनीचे कर्मचारी आणि लोहा येथील पोलीस अंमलदार असे मिळून चंद्रकांत मोहनराव क्षीरसागर यांच्या आडगाव येथील घरी गेले आणि तेथे तुमचे घर सिल करायचे आहे कारण तुम्ही कर्ज भरलेले नाही असे सांगितले. त्यावेळी मी फायनान्स कंपनीच्या लोकांना काही दिवसांत तुमचे पैसे भरतो असे सांगितले तेंव्हा त्यांनी मुख्य कार्यालयाला विचारून उत्तर देतो असे म्हणाले. त्याचवेळी तेथे हजर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या फोनवर ओमकांत चिंचोळकर यांनी फोन केला आणि घर सिल करूनच या असे सांगितले. तेंव्हा महेंद्रा कंपनीने माझे घर सिल केले. त्यानंतर 28 फेबु्रवारी रोजी मी माझ्या मित्र मंडळीकडून उसने पैसे घेवून महेंद्रा कंपनीचे कर्ज भरून टाकले. तेंव्हा महेंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या घरचे कुलूप काढून दिले.
दि.6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता लोहा येथील पोलीस अंमलदार किरपने व इतर माझ्या घरी आले. सिल कोणी काढले, तुमच्या घराला सिल आम्ही लावले होते. कोणाला विचारून सिल तोडले असे ओरडत होते. तेंव्हा मी बाहेर होतो. मी होमगार्ड नागेश क्षीरसागर यांच्या फोनवर फोन करून पोलीस अंमलदार किरपने यांना सांगितले की, मी महेंद्रा कंपनीचे कर्ज भरले आहे आणि महेंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच माझ्या घराचे सिल काढून दिले आहे. असे सांगितले की, पोलीस अंमलदार किरपने म्हणाले की, तुम्ही चिंचोळकर साहेबांना बोला. तेंव्हा मी चिंचोळकर यांना फोन लावला तेंव्हा ते म्हणाले कंपनीचे रिटायर अधिकारी फासगे यांनी तक्रार दिली आहे तुम्ही जर पैसे भरले असतील तर पैसे भरलेल्या पावत्या घेवून या असे सांगून मला पोलीस स्टेशन लोहा येथे बोलावले.
मी लागलीच 11.30 वाजता महेंद्रा कंपनीच्या कर्ज भरलेल्या पावत्या घेवून पोलीस ठाणे लोहा येथे गेलो. चिंचोळकर यांना पावत्या दाखवत असतांना त्यांनी बळजबरीने माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि अत्यंत अश्लील भाषेत मला शिव्या देत तु कितीही निवेदन दिले तरी शिवसेना उध्दव ठाकरे गटाला कोण कुत्र विचारत असे म्हणून ओरडून मला धमकावत एस.पी. व आय.जी. यांना एक कोटी रुपये देऊन आलो आहे असे सर्वांसमोर ओरडून सांगत होते. मी एकनाथ दादा पवारचा कार्यकर्ता आहे असे म्हणालो असता चिपड्या एकनाथ पवारच काय घेवून बसलास उध्दव ठाकरेला जाऊन सांग असे म्हणत मला जमीनवर उलटे पाडून चापटाने पायवर व शरिरावर मुक्का मार दिला. पाठीत आणि डोक्यात बेल्टने मारहाण करतांना मी चिंचोळकर मारू नका असे म्हणालो असता साहेब म्हण कुत्र्या असे म्हणून पाठीत बेल्टने गंभीर मारहाण केली. तुझी लायकी आहे काय? माझ्या पाया पड असे म्हणून मला बुटासकट पाया पडायला लावले. आमच्याकडे वेश्या बायका असतात त्यांना सांगून तुझ्या विरुध्द बलात्काराची तक्रार नोंदवून आयुष्यभर जेलमध्ये सडविल. तु माझ्या नादी लागू नको असे म्हणाले. तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणालो असता गां… मध्ये गोळ्या घालून जिवंत मारण्याची धमकी दिली. महेंद्रा फायनान्सने माझ्याविरुध्द काय केस केली हे मला सांगितलेच नाही. शिवसेनासारखे पक्ष मी खिशात घेवून फिरतो असे मोठ-मोठ्याने ओरडून सांगितले.
आज तुझा हिशोबच करतो म्हणून माझे फेसबुक अकाऊंट काढून मी 17-18 वयाचा असतांना माझ्या भावाच्या लग्न सोहळ्यात हातात तलवार घेवून काढलेला फोटो माझ्या फेसबुकवरून काढून माझ्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा क्रमांक 61/2024 दालख केला. 10 ते 12 वर्षापुर्वी मी ही फोटोची पोस्ट टाकली आहे. माझ्या घरी कोणालाच फोन लावू दिला नाही. त्यानंतर सायंकाळी 4.40 वाजता लोहा येथील माझे सहकारी व मित्र पोलीस स्टेशनला आले आणि त्यानंतर मला माझी कोठे तक्रार केलीस तर तुला सोडणार नाही असे सांगून मला सोडून दिले. खाकी वर्दीच्या आड लपलेली गुन्हेगार, गुंडविचाराचे पोलीस निरिक्षक चिंचोळकर यांनी खोटी कामे करण्यासाठी कायद्याचे संरक्षण घेवून माझ्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गांभीर्याने दखल घेवून त्यांना निलंबित करून त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करून त्यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी अशी विनंती चंद्रकांत मोहनराव क्षीरसागर यांनी आपल्या निवेदनात केली आहे. या निवेदनासोबत त्यांनी 20 फेबु्रवारी 2024 रोजी मटका, गुडगुडी बंद करण्याचे निवेदन जोडलेले आहे. सोबतच दि.7 मार्च 2024 रोजीचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपासणी करण्यास सांगितले आहे नाही तर ते सीसीटीव्ही फुटेज नष्ट होतील असेही निवेदनात लिहिले आहे.
नांदेडला चंद्रकांत क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेतली आता लोहा येथून नंादेडला काही पत्रकारांना फोन येतील आणि त्याच्या परिणामात चंद्रकांत क्षीरसागरची बातमी बहुतेक कोणी छापणार नाही असे वाटते. कारण ओमकांत चिंचोळकर यांची आणि नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांची जुनी ओळख आहे. या ओळखीचा फायदा ओमकांत चिंचोळकरला मिळतो की नाही की, आपल्या जिल्ह्यातील भावाला पत्रकार न्याय देतात हे दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *