शरिर सुखाची मागणी करणाऱ्या पत्रकाराविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-स.आदत हसन मंटो अत्यंत विद्रोही व्यक्तीमत्व त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी जवळपास 75 वर्षानंतर सुध्दा पत्रकारांबाबत खऱ्या ठरतात. अशाच एका महान पत्रकाराने एका महिला अधिकाऱ्याकडे पैशांसह शरिर सुखाची मागणी केल्यानंतर धर्माबाद पोलीसांनी त्या नामांकित पत्रकाराविरुध्द गुन्हा दाखल केला.
परवाच वास्तव न्युज लाईव्हने पत्रकारातील रुखम्या डाकूची बातमी लिहिली होती आणि त्याच दिवशी धर्माबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रुखम्या डाकूपेक्षा काही कमी नाही. रुखम्या डाकूबद्दल सुध्दा कोणी महिलेने तक्रार केली नाही हे त्याचे नशिब पण पैशांबद्दलचा विचार केला तर नांदेडमध्ये कोणताही अधिकारी, राजकीय नेता, रुखम्या डाकूची ख्याती जाणत नाही हे अशक्यच आहे.
2 मार्च रोजी धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिकारी असलेल्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कार्यालयात माहिती विचारण्यासाठी बरेचदा पत्रकार येतात. त्यात माधव हनमंते नावाचे एक महान पत्रकार आहेत. ज्यांनी 29 नोव्हेंबर 2023 रोजी त्या महिला अधिकाऱ्याला धमकी दिली की, विहिर आणि जनावरांचे गोठे या कामासाठी तुम्ही लोकांकडून पैसे घेता त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी त्याची चौकशी लावतो. याबाबत महिला अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर 23 फेबु्रवारी 2024 रोजी दुपारी महिला अधिकारी आपल्या कार्यायलात एकट्याच असतांना माधव हनमंते हे महान व्यक्ती तेथे आले आणि पुन्हा माझ्याकडे पुरावे आहेत. मी तुमची चौकशी लावू शकतो, चौकशी लावयची नसेल तर 50 हजार रुपये दे नाही तर मला एकदा शरीर सुख दे असे म्हणाले. या ब्लॅकमेलिंगविरुध्द महिला अधिकाऱ्याने आपले पती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस ठाणे धर्माबाद येथे तक्रार दिली. धर्माबादचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 354(अ) आणि 384 नुसार गुन्हा क्रमांक 40/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचाा तपास पोलीस अंमलदार विजय पंतोजी यांच्याकडे देण्यात आला आहे.
माधव हनमंते हे अत्यंत नामांकित दाखवल्या जाणारे वर्तमान पत्राचे प्रतिनिधी आहेत. महिला अधिकारी चुकली असेल तर तिच्या चुकीचे वाभाडे काढणे पत्रकार माधव हनमंतेचा हक्क आहे. परंतू पैशांची मागणी आणि शरीर सुखाची मागणी हा प्रकार दुर्देवी असतांना सुध्दा वास्तव न्युज लाईव्हला लिहावाा लागत आहे. स.हसन मंटो म्हणाले होते की, एक बिका हुवा पत्रकार और एक वैशा दोनो एकही श्रेणी मे आते है। इस में वैशाची की श्रेणी उची होती है। वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने सलाम त्या मंटोंना त्यांनी 75 वर्षापुर्वी ही पत्रकारांबद्दलची व्याख्या लिहिलेली होती ती 75 वर्षापुर्वीचे तर आम्हाला माहित नाही पण आज ज्या परिस्थितीत पत्रकार दिसतात म्हणून त्या हसन मंटोच्या व्याख्येला पुन्हा एकदा आदराने सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *