नांदेड(प्रतिनिधी)- गणेश चतुर्थीचा सुर्योदय होताच किनवट तालुक्यातील आंबाडी, पिंपळढव या जंगलात एका अनोळखी बालकाचे किंवा युवकाचे जाळलेले प्रेत सापडले आहे. तेथे सापडलेल्या कपड्यांवरून मरण पावलेला व्यक्ती तेलंगणातील असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. आज सुर्योदय होताच मांडवी घाटातील पिंपळढव शिवारात एका बालकाचे अथवा युवकाचे पुर्णपणे जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. माहिती मिळताच पोलीस विभागातील सर्वच वरिष्ठ अधिकारी, पोलीस ठाणे मांडवी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. जंगलाचा भाग तपासला जात आहे. जळालेल्या अवस्थेतील या प्रेताचे वय अंदाजे 17 ते 22 वयोगटातील असावे असे वाटते. या ठिकाणी सापडलेली लुंगी यावरून ती लुंगी याच व्यक्तीची असावी आणि लुंगीच्या आधारावर मरणारा व्यक्ती तेलंगणा राज्यातील असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. प्रेतपुर्ण पणे जळाल्याने त्या प्रेताच्या शरिरावर असलेले कोणतेही वर्णन दिसणे अशक्य आहे. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने वाचकांना विनंती आहे की, आपल्या घरातील, आपल्या आसपासच्या घरातील कोणी 17 ते 22 वयोगटाचा युवक गायब असेल तर या संदर्भाने नांदेड जल्हयातील ंडवी पोलीसांशी संपर्क साधावा. जेणे करून या मरण पावलेल्या बालकाची अथवा युवकाची ओळख पटेल. Kanthak Suryatal Post Views: 6,439 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किनवट पोलीसांनी 13 लाख 40 हजारांचा गुटखा पकडला 8 वर्षीय बालिकेवर जघन्य अत्याचार; आरोपी पोलीसांच्या ताब्यात