नांदेड(प्रतिनिधी)-2 स्पटेंबर रोजी मध्यरात्री 11 ते 3 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेदरम्यान मौजे वडगिर येथील हनुमान मंदिराची दान पेटी फोडून चोरट्यांनी 6 हजार 300 रुपये चोरून नेले आहेत. चोरटे पळून जातांना अपघात होवून जखमी झाले आहेत. बळवंत अण्णाराव बिरादार या पोलीस अंमलदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे वडगिर येथील हनुमान मंदिर फोडून दोन चोरट्यांनी त्या मंदिराच्या दानपेटीतील 6 हजार 300 रुपये चोरले. ते आपली दुचाकी गाडी भरधाव वेगात चालवून पळून जात असतांना मौजे हंगरगा फाटा येथे पुलाच्या कठड्याला धडक देवून गंभीर जखमी झाले आहेत. या चोरट्यांविरुध्द मुक्रामाबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 196/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेख हे करत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीसांनी चोरट्यांना पकडले आहे. Kanthak Suryatal Post Views: 760 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेतकऱ्यांनो सावधान राहा-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार लाच प्रकरणातील सेवानिवृत्तीनंतर पोलीस निरिक्षक उत्तम मुंडेंची मुक्तता