नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने सहायक पोलीस उपआयुक्त ते पोलीस उपआयुक्त, पोलीस निरिक्षक ते पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक ते पोलीस निरिक्षक यांना पदोन्नती देण्यासाठी बऱ्याच त्रुटींना दुरूस्त करण्याच्या सुचना राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांना दिल्या होत्या. त्या संदर्भाची व्हिडीओ कॉन्फ्रन्सींग कालच पार पडली आहे. नांदेड जिल्ह्यातील यात महत्वाचे नाव अशोक ययातीराव घोरबांड यांचे आहे. त्यांच्याविरुध्द पोलीस महासंचालक कार्यालयाने जुलै 2025 मध्ये उघड संपतीची चौकशी करण्याची मंजुरी दिलेली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातील पोलीस महासंचालकाचे वरिष्ठ उपसहाय्यक (आस्थापना) श्रीशैल इमडे यांनी 23 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या पत्राप्रमाणे राज्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त ते पोलीस उपआयुक्त यांना पदोन्नती देण्याच्या यादीमधील 31 जणांच्या त्रुटी पुर्ण करुन देण्यास सांगितले आहे. त्या त्रुुटीपुर्ण झाल्याशिवाय पदोन्नती मिळत नसते. पोलीस निरिक्षक ते पोलीस उपअधिक्षक यांच्या पदोन्नतीमध्ये एकूण 101 जणांच्या नावांसमोर त्रुटी दाखवलेली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील अत्यंत नामांकित व्यक्तीमत्व अशोक ययातीराव घोरबांड यांचे सुध्दा आहे. ते सध्या बाभळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत. त्यांच्याविरुध्द लोहा येथील रमेश माळी यांनी उघउ संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. 27 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने या उघड चौकशीसाठीचे मंजुरीचे पत्र पोलीस महासंचालक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना पाठविले होते. ती चौकशी अद्याप पुर्ण झाली की, नाही माहित नाही. नसेल झाली तर पदोन्नती मिळणार नाही. या पदोन्नतीच्या यादीत 52 क्रमांकावर अशोक ययातीराव घोरबांड यांचे नाव मुद्रीत आहे. पोलीस उपनिरिक्षक ते सहाय्यक पोलीस निरिक्षक अशी पदोन्नती देण्यामध्ये 115 पोलीस उपनिरिक्षकांच्या नावासमोर त्रुटी नमुद केली आहे. राखीव पोलीस उपनिरिक्षक ते राखीव पोलीस निरिक्षक यांच्या यादीमध्ये 115 जणांच्या नावापुढे त्रुटी नमुद केल्या आहेत. पोलीस उपनिरिक्षकांच्या यादीत त्रुटी असलेल्या लोकांमध्ये नांदेडच्या दोन पोलीस उपनिरिक्षकांचा समावेश आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे महाराष्ट्राच्या सात महसुल विभागांमध्ये एकूण 463 जागा सहाय्यक पोलीस निरिक्षक पदासाठी शिल्लक आहेत. त्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षकांची पसंती मागवली आहे आणि सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या यादीत 379 जणांची नावे आहेत. त्यात पाच सहाय्यक पोलीस निरिक्षक नांदेडचे आहेत. Kanthak Suryatal Post Views: 8 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मध्यरात्री १ वाजता दिल्ली विमानतळावर हाय-व्होल्टेज ड्रामा! ऑक्सफर्डला चाललेल्या सौरव दास यांना इमिग्रेशनवर रोखले; मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल! खऱ्या अर्थाने बोध मिळवायचा असेल तर बोध कीर्तन पुस्तक वाचावेच लागेल