दैनिक सामना मध्ये पत्रकार म्हणून काम सुरू केलेल्या संजय राऊत यांनी पुढे सामनाचे कार्यकारी पदापर्यंत पोहचले आणि खासदार ही झाले. राजकीय वळणांमध्ये ज्या काही कुट निती, खलबते यांचा वापर केला जातो. त्यात एका खलबतात त्यांना अडकवले गेले आणि त्यांना जवळपास 100 दिवस तुरूंगवास भोगावा लागला. त्यांनी या 100 दिवसांमध्ये दोन पुस्तके लिहिली. नरकातला स्वर्ग आणि बोध किर्तन आम्ही यापुर्वी नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे परिक्षण आमच्या शब्दात लिहिले होते आज आम्ही पुन्हा एकदा बोध किर्तन या पुस्तकाचे परिक्षण वाचकांसाठी सादर करीत आहोत. हे पुस्तक मेहता पब्लिशन हाऊस प्रा.लि.पुणे यांनी 1941 सदाशिव पेठ, माडीवाले कॉलनी पुणे येथे प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे मुद्रक ट्रिनिटी ऍकॅडमी फॉर कॉर्पोटे ट्रेनिंग लि. यांनी केले आहे. या पुस्तकाचे मुख पृष्ठ मेहता पब्लिशिन हाऊस यांनी बनविले आहे. या पुस्तकाच्या आतील छायाचित्रे प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटली आहेत. या पुस्तकासाठी भगवान हा रुगडे यांचे विशेष सहाय आहे. हे पुस्तक ऑक्टोबर 2026 मध्ये प्रकाशित झाले आणि त्याचे पुर्नमुद्रण नोव्हेंबर 2026 मध्ये करण्यात आले. 227 पानांचे पुस्तक यामध्ये 7 शब्दांचा सुध्दा एक वेगळा भंडार आहे तर काही दहा ओळी, काही सात ओळी, काही तीन ओळी, काही वीस ओळी असे शब्द लेखन आहे. या प्रत्येक शब्दाला वेगळे महत्व आहे. नरकातला स्वर्गमध्ये खा.संजय राऊत यांनी एक विवेचन लिहिले की, तुरूंगात काय असते आणि त्याला स्वर्ग कसे समजाचे. बोध किर्तनमध्ये त्यांनी जेंव्हा-जेंव्हा जे-जे आठवले ते ते एका कागदावर लिहिले आणि त्या सर्व कागदांचा संगृह करून त्यांनी हे बोध किर्तन नावाचे पुस्तक लिहिले. सोबतच या पुस्तकात काही ठिकाणी छोटी-छोटी रेखा चित्रे सुध्दा रेखाटली आहेत. त्यांना सुध्दा खुप मोठे महत्व आहे. रडणाऱ्या उंटीणीची कथा असा एक सव्वा दोन पानांचा लेख आहे. ज्याच्या शेजारी एक उंटीणी रडते आहे आणि तिचे लेकरू तिच्या समोर उभे आहे. यावरून जसे काही ती आपले रडणे आपल्या लेकराला सांगत आहे असे वाटते. डॉ.आंबेडकरांनी दगडाला शेंदूर लावून त्याला देव समजले जाते या दोन वाक्यांना लिहितांना त्यांनी त्यातील संदेश प्रसारीत केला आहे की, दगडाला शेंदूर लावणे सोपे आहे. परंतू नंतर तो शेंदुर खरवडून काढणे अवघड आहे. यातील संदेश खुप मोठा आहे. दोन कापलेल्या हातांचे रेखाचित्र आणि त्याच्या शेजारी लिहिलेले तीन वाक्य हे सांगते की, आपले खोटे हिंसेनेच पचवता येते. त्यांनी आपल्या पुस्तकात तेच करा या मथळ्याखाली लोकमान्य टिळकांचे तत्वज्ञान लिहिले आहे. या पुस्तकामध्ये अत्यंत छोटी-छोटी प्रकरणे आहेत. यात विचार, सुविचार, काव्य, उदाहरणे, लहान कथा, पत्र, प्रकरणांचा अभ्यास, मनातील उद्रेक, आवडणाऱ्या व्यक्ती, युध्द, प्रेम, प्राचीन काळातील बोधक संवाद, धर्मकथा या कोणत्याही दृष्टीकोणातून वाचकांनी या पुस्तकाचे वाचन केले तर त्यांना प्रत्येक शब्द पाहायला मिळेल आणि त्याचा अर्थ कळेल. आपले हे पुस्तक खा.संजय राऊत यांनी आपल्या दिवंगत बहिण मिना पठारे यांच्या स्मृतीस अर्पण केले आहे. आपण लिहिलेल्या पुस्तकांबद्दल खा.संजय राऊत तुरंगातील शंभर दिवसांना धन्यवाद देतात. म्हणजे ते तर तुरूंगात गेले नसते तर हे लिखाण घडलेच नसते. म्हणून आपल्यावर आलेल्या वाईट वेळेला सुध्दा त्याचा सदउपयोग चांगल्या पध्दतीने करू शकतो हे घेणे सारखे आहे. आपल्या प्रास्ताविकात अत्यंत छोट्या शब्दात संकटाच्या काळात जीवनाला कसे धडे दिले जातात. किंबहुना द्यायला हवे हा बोध या पुस्तकात आहे. आपल्या जीवनातील 10 पुस्तके माझ्या मनाला कशी उभारी देणारे होते. याचा उल्लेख केला आहे. बावरी मशिदीच्या निकालाबद्दल दहा वाक्यात खा.संजय राऊत यांनी बाबर यांनी आपला पुत्र हुमायु यासाठी लिहिलेले पत्र उल्लेखीत केले आहे आणि त्याचा शेवट असा आहे की, जेंव्हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यात लिहिले आहे की, मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे कोणतेच पुरावे सापडले नाहीत. तो आपल्या पोटासाठी पाव चोरतो तो तुरूंगात जातो. जो खुप मोठी चोरी करतो, दरोडा टाकतो तो करीअर बनवतो. दरोडेखोरीस अशा पध्दतीने स्मार्ट बिजनेस बनवले जाते. या तीन वाक्यांमध्ये एवढा मोठा अर्थ दडलेला आहे की, प्रत्येक वाचकाने आपल्या समोर घडणाऱ्या घटनांना आपल्या जीवनाशी जोडून पाहिले तर वाचकांना नक्कीच वाटेल की या जगात सर्वोकृष्ट व्यक्ती आपण स्वत: आहोत. काही जण आपल्या जीवनात एकटेपणाला कंटाळतात पण या एकटेपणाबद्दल खा.संजय राऊत यांनी लिहिले आहे की, हे छान आहे की, तुम्ही एकटे आहात. कारण सुर्य सुध्दा आकाशात एकटा आहे आणि गुरूड सुध्दा आकाशात एकटाच भरारी घेतो. आज भारतात हिंदु-मुस्लमान या नावावर राजकारण चालते या संदर्भाने सुध्दा खा.संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात इस्लाम काय आहे याचे वर्णन फक्त एका प्रसिध्द शायरच्या शब्दात मांडले आहे. एकदम छोट्याशा पाच ते सात ओळीत इस्लाम समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे. तुरूंगात चुकीची लोके जातात असा समज आहे. देव आणि देवाऱ्यातील भाग हा पवित्र असतो. पण तो चोरांनी कसा अपवित्र केला याचा उल्लेख या गं्रथात आहे. महाभारताचा उल्लेख करून खरा अपराध काय असतो. हे सांगतांना खा.संजय राऊत यांनी 12 वाक्यातच खरा अपराध समजून सांगितला आहे. आपण दारु पिणाऱ्यांना बेवडा हा शब्द वापरतो. पण खा.संजय राऊत यांनी मद्यप्रेमींना चर्चिलच्या नावाने पुरस्कार द्यायला हवा अशी मांडणी 40 वाक्यांमध्ये केली आहे कारण चर्चिल हा एक सभ्य आणि उमदा मद्यप्रेमी होता लिहितांना खा.राऊत यांनी मधुशाळेत चर्चिलचा फोटो लावायला हवा अशी शिफारस केली आहे.बोलणी(टॉक) संपल्यावर हा विषय आजच्या जागतीक परिस्थितीसोबत कसा उलट दिशेने चालला आहे. याची एक उत्कृष्ट मांडणी या पुस्तकात आहे. मुंबईमध्ये वडापाव हे सर्वात मागणीचे खाद्य आहे. हा वडापाव कसा तयार होतो. याचे उत्कृष्ट वर्णन खा.संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. कल्याणकारी राज्य कसे असावे याचा उल्लेख आठ ओळीत करून दाखवला आहे. पाणीपतच्या बखरीमधील उल्लेख करून भाऊसाहेब मृत्यूचा शोध घेत रणांगणात फिरत आहेत. याचा उल्लेख खा.राऊत यांनी 6 वाक्यातच केला आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे तत्वाज्ञ लक्षात ठेवण्याची सुचना खा.राऊत यांनी केली आहे. लोकमान्य टिळक सांगत असत ज्या क्षणाला जे करणे अपरिहार्य आहे ते करा. हा विषय दोनच वाक्यात आहे. परंतू या दोन वाक्यामध्ये आजच्या जगात आम्हाला काय करायला हवे यात मांडले आहे. सगळ्यांना सगळे हवे आहे. हे दीड पानांत मांडतांना काही मागितल तर ते मिळतच अस काही नाही. परंतू ज्या संघर्षात आम्ही जगतो आहोत हे ओळखण्याची कला या दीड पानातून येते. आजच्या परिस्थितीमध्ये सर्वांसाठी हा प्रश्न मोठा आहे की, कोठे थांबायचे आणि तेच लोकांना कळत नाही. याचा उदाहरणासोबत उल्लेख करतांना खा.संजय राऊत यांनी प्रभु श्रीराम आणि प्रभु श्रीपरशुराम यांचा उल्लेख केला आहे. यातून हेच घेता ायेते की, काळानुरुप आपल्याला टिकायचे असेल तर काळाच्या विरुध्द चालून आपण टिकणार नाही. आज महाभारत, श्रीमद् भगवत गीता हा हजारो वर्षापुर्वीचे ग्रंथ आहे. परंतू त्याचा उद्योगधंदा आजही कसा चालतो आहे याचे उत्कृष्ट वर्णन खा.संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. आज आहे तो काळ थांबत नाही तो बदलणार असतो. याबद्दल अनेक संत महंतांनी भारताला उपदेश केलेले आहेत. म्हणून आपण स्वत:ला कोळसा समजण्यापेक्षा आपण हिरे आहोत असा समज प्रत्येकाने बाळगावा म्हणजे तुमच्या समोर असणारा काळ बदलणार आहे हे स्पष्टपणे दिसते. बाप मुलाला काय सांगतो याचे एक पत्र खा.राऊत यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. त्यात 11 विविध मांडण्या करण्यात आल्या आहेत आणि सर्वात शेवटी आईला विसरु नकोस असा एक संदेश दिला आहे. तथागत गौतम बुध्द आणि महात्मा गांधी यांचे नाव अहिंसेशी जोडले जाते. पण संजय राऊत याला वेगळ्या पध्दतीने मांडतात आणि ते सांगतात की, गांधी शाकाहारी होते परंतू पुर्णपणे अहिंसक नव्हते. हे सुध्दा संजय राऊत यांनी 12 वाक्यातच मांडले आहे. सांब हा श्रीकृष्णाचा नातू होता आणि त्याला श्रापामुळे मिळालेला परिणाम काय झाला आणि पुढे त्याचा उपयोग कसा झाला आणि त्यालाच यादवी असे म्हणतात हे खा.संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे. सर्वात शेवटी कुठे अक्षर आणि शब्द? आम्ही कधी काळी बोरु शाईमध्ये बुडवून कित्ते गिरवत होतो. हस्ताक्षर स्पर्धा होत होत्या. आता पेन, पेन्सिल, खोडरबर, अर्थात अक्षर असे काहीच उरलेले नाही. अक्षर यात्रा जवळपास संपली आहे. नरकातील स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर हे दुसरे पुस्तक बोध कीर्तन प्रसिध्द करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी मदत केली. त्यांना धन्यवाद देवून खा.संजय राऊत यांनी आपल्या या पुस्तकाचे समापन केले आहे. अत्यंत छोट्या-छोट्या भागांमध्ये बोध कीर्तन आम्ही वाचकांसमोर मांडत असतांना सर्वच पुस्तक आमच्या लिखाणात येणार नाही याची दक्षता ठेवली आहे, कारण पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे आणि त्या पुस्तकातून बोध सुध्दा घेतला पाहिजे. Kanthak Suryatal Post Views: 6 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जम्बो पदोन्नत्यांसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने मागितली माहिती;नांदेडचे अशोक ययातीराव घोरबांड यांचे काय होणार