नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे सुरू असलेल्या श्री शिवपुराण महाकथेचे श्रवण कर ण्यासाठी आलेल्या हदगाव येथील एका शिक्षकाचे घर चोरट्यांनी धुवून काढले आहे. त्यातून 11 लाख 80 हजारांचा ऐवज चोरट्यांनी घेवून गेले आहेत.
यशवंतनगर हदगाव येथे राहणारे शिक्षक राजीव विठ्ठल राणे आणि त्यांचे कुटूंबिय दि.22 ऑगस्ट रोजी सायंकाळी आपल्या घरातून नांदेडकडे आले. त्यांना पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखारविंदाने होणारी श्री शिवपुराण महाकथा ऐकायची होती. 23 ऑगस्ट रोजी शिवपुराण कथेच्या मंडपात पावसाने व्यथ्यआणला म्हणून राणे कुटूंबिय 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी आपल्या घरी हदगाव येथे पोहचले. या तीन दिवसात बंद असलेल्या घराचा फायदा चोरट्यांनी उचलला. चोरट्यांनी मुख्य द्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि राणे यांच्या घरातील 11 लाख 30 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे आणि 50 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 11 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हदगाव पोलीसांनी भारतीय न् याय संहितेच्या कलम 331(3), 331(4), 305 (ए) नुसार गुन्हा क्रमांक 354/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक उमश रायबोळे यांच्याकडे देण्यात आला आहे.