नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली येथील प्रसिध्द आणि ज्येष्ठ वकील ऍड.वसंतराव गोविंदराव बिलोलीकर यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. आज मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बिलोली येथे ऍड.वसंतराव गोविंदराव बिलोलीकर (77) हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथे रुग्णालयात उपचार सुरू होते.6 ऑगस्टच्या मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात प्रशांत बिलोलीकर व उमेश बिलोलीकर ही दोन मुले आहेत. अनिता चौधरी ही मुलगी आहे. सोबत सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज दुपारी 1 वाजता मुंबई येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा बिलोलीकर कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,140 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation चोरीचा गुन्हा उघडकीस आणतांना बिलोली पोलीसांनी चोरीचा ऐवज 100 टक्के जप्त केला नेहरूनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेतील १३ विद्यार्थ्यांना विषबाधा