नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चोरी आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. धर्माबाद येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह २ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर उमरी येथे मायक्रोफायनान्स कंपनीच्या ग्राहकांकडून कर्जाचे हप्ते वसूल करून कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता ३ लाख ५५ हजार २३२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धर्माबादमध्ये बंद घर फोडले धर्माबाद येथील मनसरोवर कॉलनी, बनाळी रोड परिसरातील फिर्यादी मनीषा विश्वंभर महामुनी (वय ५१) यांच्या घरात १४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ ते १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मनीषा महामुनी यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरीत मायक्रोफायनान्स कंपनीला गंडा दुसऱ्या घटनेत उमरी येथे मायक्रोफायनान्स कंपनीच्या ग्राहकांकडून कर्जाचे हप्ते वसूल करून ते कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता ३ लाख ५५ हजार २३२ रुपयांची रक्कम हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी साईनाथ देविदास पोटरे (वय २९, रा. दिवशी बु., ता. भोकर) याने १३ फेब्रुवारी २०२५ पासून पुढील कालावधीत ग्राहकांकडून कर्जाचे हप्ते जमा केले. मात्र, ही रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता कंपनीची फसवणूक केल्याची फिर्याद प्रमोद जनार्दन डेंगे (वय ४०, व्यवसाय नोकरी, प्रादेशिक व्यवस्थापक, मुथूट मायक्रोफायनान्स, रा. बहादुरा सरस्वती नगर, नागपूर) यांनी दिली. या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 30 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जुन्या वादातून चारचाकीने धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न