नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्यावतीने आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. वकील संघटनेचा सुध्दा कर्मचारी संघटनेच्या मागणीला पाठींबा आहे. कारण यापुर्वी सुध्दा कर्मचारी महासंघाने दोन वेळा आंदोलने केली. परंतू शासनाच्यावतीने प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून कर्मचारी महासंघाने आपले आंदोलन सुरू केले आहे. परंतू यामुळे पक्षकारांच्या होणाऱ्या हाल अपेष्ठा यावर काही उपाय नाही. संप सुरु झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावर शासनासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

आज सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हा न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर टेंन्ट लावून सर्व न्यायालयीन कर्मचारी संपावर बसले. वकील मंडळी आत जात होती. न्यायालय सुध्दा उघडे होते. पण न्यायालयात न्यायाधीशांशिवाय कोणी दिसले नाही. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे यांनी आंदोलन स्थळावर येवून कर्मचाऱ्यांना मुख्यद्वार बंद होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. कर्मचारी महासंघाचा विजय असो, भारत माता की, जय या घोषणासह सर्व कर्मचाऱ्यांनी आपले बेमुदत आंदोलन सुरू केले.

 

यासाठी लागणारी महानगरपालिकेची परवानगी, पोलीस विभागाची परवानगी त्यांनी घेतली आहे. कायदेशीर सोपास्कार पुर्ण करणे हा एक भाग झाला. मात्र पक्षकारांच्या हालअपेष्ठाकडे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारतांना लक्ष दिलेले नाही. कारण बरेच पक्षकार बाहेरगावहून आले होते. त्यांना येण्या-जाण्याचा खर्च लागला आणि काम काही झाले नाही. एक तारीख वाढवून द्यायची आहे. एवढे काम करण्यासाठी संबंधीत न्यायाधीशांना किती संचिका चाळाव्या लागतील आणि हवे ती संचिका त्यांना मिळेल का? हा प्रश्न उपस्थित झाला.

नांदेड जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. यदुपत अर्धापूरकर यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी वकील संघटनेचा पाठींबा आहे. पण आज न होणारे काम त्रासदायक आहे. कारण काही पक्षकारांना आजची तारीख महत्वाची होती. काही पक्षकारांना बाहेरगावहून तारखेसाठी यावे लागले. अशा अनेक परिस्थितींवर नांदेड जिल्हा वकील संघ काय करता येईल याचा विचार करत आहे. कारण संप आज समाप्त झाला नाही तर न्यायालयीन कर्मचारी महासंघाने संप बेमुदत घोषित केलेला आहे. ही सर्वात मोठी अवघड परिस्थिती आहे.

महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघातील सदस्य बबन गजभारे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयीत कर्मचारी वर्ग आणि जिल्हा न्यायालयीत कर्मचारी वर्ग यांच्या वेतन श्रेणीमध्ये असलेला फरक जोपर्यंत एकसारखा करण्यात येणार नाही तो पर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहिल. बबन गजभारे यांनी सांगितले की, अगोदर ही वेतनश्रेणी एकच होती. परंतू काही दिवसांपुर्वी या वेतन श्रेणीमध्ये फरक करण्यात आला . उच्च न्यायालयातील कर्मचारी वर्ग आणि जिल्हा न्यायालयातील कर्मचारी वर्ग एकसारखेच काम करतात. त्यामुळे वेतनश्रेणीमध्ये करण्यात आलेला फरक हा जिल्हा कर्मचाऱ्यांवर अन्याय कारक आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालय आणि महाराष्ट्रातील सर्व न्यायालयांमध्ये कार्यरत असलेले सर्वच कर्मचारी

कर्मचाऱ्यांच्या संपाचा व्हिडीओ…

नांदेड जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. यदुपत अर्धापूरकर यांचा व्हिडीओ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!