• नऊ वर्षांत 74 हजार 797 रुग्णांना मिळाली जीवनदायी मदत; 137 रुग्णवाहिकांचे जाळे कार्यरत नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या टोल फ्री ‘102’ रुग्णवाहिका सेवेत नांदेड जिल्ह्याने राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. मागील नऊ वर्षांत या सेवेद्वारे जिल्ह्यातील तब्बल 74 हजार 797 रुग्णांना वेळेवर आपत्कालीन वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायी ठरत आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेंतर्गत नांदेड जिल्ह्यात टोल फ्री 102 व 108 या दोन्ही रुग्णवाहिका सेवा कार्यरत आहेत. यामध्ये 108 क्रमांकाच्या 25, तर 102 क्रमांकाच्या 112 अशा एकूण 137 रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. अत्यावस्थ रुग्णांनाही सेवेचा लाभ शासनाच्या डिसेंबर 2025 मधील परिपत्रकानुसार 102 रुग्णवाहिका सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. यापूर्वी गरोदर माता व एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकांसाठी उपलब्ध असलेल्या या सेवेचा लाभ आता विविध अत्यावस्थ रुग्णांनाही दिला जात आहे. यामध्ये अपघातग्रस्त, हृदयरोगी, विषबाधा झालेले, सर्पदंश झालेले, भाजलेले, मारहाणीत जखमी झालेले, मेंदूविकाराचे रुग्ण, कुत्रा चावलेले तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. Kanthak Suryatal Post Views: 11 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बदली, सेवा समाप्ती व कारणे दाखवा नोटीसची कारवाई