नांदेड – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी मुन्तजिबोद्दीन मुनीरोद्दीन यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी श्रीवेल्ला प्रसाद ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्य आरिफ नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, नांदेडचे खा. रविंद्र चव्हाण तसेच माजी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांचे नियुक्तीबद्दल त्यांनी विशेष आभार मानले आहेत. पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून उदगीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना नवनियुक्त विधानसभा प्रभारी मुन्तजिबोद्दीन यांनी व्यक्त केली. निवड झाल्याबद्दल नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. Kanthak Suryatal Post Views: 5 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर वजीराबाद पोलिसांचा छापा!