“Probity for Prosperity” (सत्यनिष्ठा से समृद्धि) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दिनांक 28 ऑक्टोबर 2026 रोजी विभागीय रेल्वे कार्यालय, नांदेड येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये सतर्कता जागरूकता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 दरम्यान साजरा करण्यात येत असलेल्या सतर्कता जागरूकता सप्ताह 2026 अंतर्गत या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग होते. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात शासकीय कर्तव्य बजावताना सत्यनिष्ठा, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिक आचरणाचे महत्त्व अधोरेखित केले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून निर्धारित कार्यपद्धती व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पारदर्शक, कार्यक्षम व भ्रष्टाचारमुक्त रेल्वे प्रशासन निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या परिसंवादात मुख्यालयातील सतर्कता अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांना सतर्कता, नियमांचे पालन आणि शासकीय सेवेमधील नैतिक आचरणाच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले. परिसंवादात सहभागी झालेले सतर्कता अधिकारी: * सीएच राकेश, उप मुख्य सतर्कता अधिकारी, ट्राफिक आणि आर पी एफ * बी. सिवा प्रसाद, उप मुख्य सतर्कता अधिकारी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल तथा दूरसंचार * एस.वी,डी. रघुनाथ रायुडू, उप मुख्य सतर्कता अधिकारी, स्टोर्स आणि मेडिकल * बदा रामा राव, उप मुख्य सतर्कता अधिकारी, इंजिनीरिंग सतर्कता अधिकाऱ्यांनी शासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना कार्यपद्धतीचे पालन, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सतर्कता यांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच रेल्वे प्रशासनाची कार्यक्षमता व विश्वासार्हतेवर विपरीत परिणाम करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांविरुद्ध सतर्क राहण्याची आणि उच्च दर्जाची सत्यनिष्ठा व नैतिक आचरण कायम ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी सीएच कल्याण राजू , अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड, डॉक्टर एम. श्रीनिवास, मुख्य चिकित्सा अधीक्षक, शाखाधिकारी तसेच नांदेड विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिसंवादातून “Probity for Prosperity” (सत्यनिष्ठा से समृद्धि) हा संदेश अधोरेखित करण्यात आला. प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याने सत्यनिष्ठा व पारदर्शकता जपत अधिक उत्तरदायी, कार्यक्षम आणि विश्वासार्ह रेल्वे प्रशासनाच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 204 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वाडी ग्रामीण रुग्णालयाला पद्मश्री कै.शामराव कदम यांचे नाव द्या!-ओमप्रकाश पोकर्णा