नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड हे तीर्थ स्थळांचे ठिकाण असल्याने नांदेडमध्ये बाहेर जिल्ह्यातून तसेच देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची दररोज ये-जा असते. तसेच नांदेड-पुणे ते पुणे नांदेड या मार्गावर दररोज विविध ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशी वाहतुक करीत असतात. अव्वाच्या सव्वा प्रवाशी दामटून बसवून बेकायदेशीर प्रवाशी वाहतुक करतातच त्याचसोबत याच ट्रॅव्हल्समधून विना परवाना पार्सलची सेवा देत असतात. या ट्रॅव्हल्सला फक्त ठरवून दिलेल्या प्रवाशी क्षमतेपेक्षा इतर कोणतीही वस्तु किंवा पार्सल वाहतुक करण्याची परवानगी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेली नसतांना सुद्धा प्रशासनाच्या डोळ्यादेखत सर्रासपणे बेकायदेशीर पार्सलची सेवा सुरू आहे. पार्सल सेवेच्या नावाखाली चालणारी बेकायदेशीर धंदा तात्काळ बंद करून ट्रॅव्हल्स मालकांवर कायदेशीर कठोर कारवाई करा, अन्यथा प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा लोकश्रेय मित्र मंडळाचे नांदेड जिल्हाध्यक्ष रविकांत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे दिला आहे. नांदेड ते पुणे, पुणे ते नांदेड तसेच नागपूर-नांदेड, नांदेड-इंदोर यासह महाराष्ट्रात मोठ-मोठ्या शहरामध्ये प्रवाशी वाहतुकीचे काम करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत. मनमानी टिकीट शुल्क आकारून प्रवाशांची लुट करणाऱ्या या ट्रॅव्हल्स कंपन्या पार्सलच्या धंद्यामध्ये लाखोंचा शासनाचा महसुल बुडवित आहेत. मराठवाडा हा दुष्काळ जाहिर झाला असून जिल्हा प्रशासनाने प्रवाशी वाहतुक करणाऱ्या सर्वच वाहनांना सक्त सुचना दिलेल्या असून आगाऊ टिकीट आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सना दंड आकारला जाईल असा इशारा दिला आहे. यासोबतच या ट्रॅव्हल्स कंपन्यांची चौकशी केल्यास बेकायदेशीर पार्सलचा धंदा किती मोठ्या प्रमाणात चालु आहे हे उघड होईल. शासनाच्या नियमांचा भंग करणाऱ्या या ट्रॅव्हल्स मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांचा ट्रॅव्हल्स प्रवाशी परवाना तात्काळ रद्द करावा अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा रविकांत गायकवाड यांनी दिला आहे. यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 250 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये जय भीम Gen Z टाऊनहॉल; सुजात आंबेडकर 31 ऑक्टोबर रोजी साधणार तरुणांशी संवाद वाडी ग्रामीण रुग्णालयाला पद्मश्री कै.शामराव कदम यांचे नाव द्या!-ओमप्रकाश पोकर्णा