नांदेड (प्रतिनिधी)-पावडेवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला पद्मश्री, सहकारमहर्षी कै. शामराव कदम यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदनाद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे. पावडेवाडी येथील 100 खाटांच्या नूतन ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यातच रुग्णालयाला पद्मश्री,सहकारमहर्षी कै. शामराव कदम यांचे नाव देण्याची अधिकृत घोषणा करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. कै. शामराव कदम यांच्या कार्याची आणि या भागाच्या विकासातील योगदानाची पावती म्हणून रुग्णालयाला त्यांचे नाव देणे उचित ठरेल, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. या मागणीसाठी परिसरातील सर्व पक्षांचे नेते, सरपंच, चेअरमन, आमदार, माजी आमदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्याचे निवेदनात नमूद आहे. पावडेवाडी येथील नूतन रुग्णालयाला कै.शामराव कदम यांचे नाव देण्याची मागणी पूर्ण करून त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी अपेक्षा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी व्यक्त केली आहे. Kanthak Suryatal Post Views: 246 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रवाशी वाहतुकीच्या नावाखाली बेकायदेशीर पार्सल सेवा देणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकावर कठोर कारवाई करा-रविकांत गायकवाड सतर्कता जागरूकता सप्ताह 2026 अंतर्गत नांदेड विभागात सतर्कता जागरूकता परिसंवादाचे आयोजन