नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस उपविभागातील गुन्हे शोध पथकाने दोन जणांना पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस, एक तलवार आणि एक चाकू अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत.
इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लूरोड, हबीब चाऊस आणि श्रीराम दासरे यांनी 14 मे रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास देगलूर नाका परिसरातील कापुस संशोधन केंद्राच्या गेटजवळ सय्यद आवेस सय्यद खलील (24) रा.हबीबीया मस्जीदजवळ खुदबईनगर नांदेड आणि शेख समीन उर्फ अरबाज शेख रौफ (23) रा.असद मदनी कॉलनी खुदबईनगर नांदेड या दोघांना पकडले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तल, एक जिवंत काडतुस, एक तलवार आणि एक चाकू अशी घातक हत्यार जप्त करण्यात आली आहेत. या दोघांविरुध्द इतवारा पोलीस ठाण्यात हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा क्रमांक 129/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव करीत आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.