भोकरमध्ये शेतातील सात लाखांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान; तीन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरासह जिल्ह्यात चोरी आणि मालमत्तेचे नुकसान करण्याच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. भाग्यनगर परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याची मिनी गंठण हिसकावण्यात आली, तर वजिराबाद येथील कर्मवीर हॉस्पिटलजवळ उभ्या कारची काच फोडून लॅपटॉपसह साहित्य चोरीला गेले. दुसरीकडे, भोकर तालुक्यातील लामकाणी येथे शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाग्यनगर मध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची गंठण हिसकावली भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरुमला नगर, नांदेड येथे २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३५ वाजण्याच्या सुमारास हिसकावून नेण्याची घटना घडली. फिर्यादी गायत्री कैलास रेनवाड (वय ३८, रा. फरांदे नगर, नांदेड) या जात असताना दोन अज्ञात इसमांनी संगनमत करून मोटारसायकलवरून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याची मिनी गंठण हिसकावून नेली. या गंठणची किंमत ८३ हजार ९८३ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत. वजीराबाद मध्ये कारची काच फोडून लॅपटॉप लंपास वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्मवीर हॉस्पिटलजवळ २३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १.३६ वाजता चोरीची घटना घडली. फिर्यादी श्रीनिवास किशयाजी उपलपवार (वय ४०, रा. उमरेड रोड, नागपूर) यांनी आपली गाडी तेथे उभी केली होती. अज्ञात चोरट्याने गाडीच्या डाव्या बाजूची काच फोडून आत ठेवलेला डेल कंपनीचा लॅपटॉप, चार्जर व इतर साहित्य चोरून नेले. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत ५३ हजार ९०० रुपये असल्याचे नमूद आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार येमकर तपास करीत आहेत. लामकाणी येथे सात लाखांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान भोकर तालुक्यातील लामकाणी शिवारात २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ ते पहाटे २.४३ वाजण्याच्या दरम्यान शेतातील उभ्या सोयाबीन पिकाचे नुकसान करण्यात आले. फिर्यादी मारोती माधवराव सूर्यवंशी (वय २२, रा. लामकाणी, ता. भोकर) यांच्या शेतातील सोयाबीन पीक अज्ञात व्यक्तीने आगीच्या भक्ष्यस्थानी घालून नुकसान केल्याची तक्रार आहे. या घटनेत सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२६(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कंधारे तपास करीत आहेत. या तीनही घटनांमुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा तसेच शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रकरणांतील आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 34 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दुष्काळात पशुधनासाठी चारा व्यवस्थापनावर भर द्या-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले