नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकप) च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांना निवेदन देऊन विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील कष्टकरी, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, या मागणीसाठी माकप आणि संबंधित जनसंघटनांच्या वतीने सातत्याने आंदोलने केली जात आहेत. मात्र, अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी डीवायएफआय नांदेड तालुका कमिटीच्या वतीने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी, तसेच सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री कोमवाड यांच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलनाच्या अनुषंगाने मांडण्यात आलेल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सोमेश्वर , ता. जि. नांदेड व ग्रामपंचायत खांबेगाव ता. लोहा, जि.नांदेड येथील प्रश्नांबाबत 5 ऑक्टोबर व 1 ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या उपोषणाच्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. निवेदनाद्वारे संबंधित प्रश्नांची चौकशी करून प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी आंदोलकांनी केली.त्यावेळी सिईओ महेश पाटील यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरु असून ती पूर्ण झाल्यावर योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. या निदर्शने आंदोलनात नांदेड बिडीओ मुर्दाबाद, विस्तार अधिकारी कांबळे यांच्यावर कारवाई करा. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करा अशा घोषणा देऊन जिल्हा परिषद परिसर दनाणून टाकला. या आंदोलनाचे नेतृत्व माकपचे नांदेड तालुका कमिटी सचिव तथा जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ.गंगाधर गायकवाड, जिल्हा कमिटी सदस्या कॉ. उज्वला पडलवार, कॉ.लता गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड,कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. प्रदीप महाजन, कॉ. सुभाषचंद्र गजभारे, कॉ. प्रकाश सरोदे, सुरज सरोदे, दिलीप कंधारे, संगेश खंदारे, आंदोलनकर्ते सेवा निवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, बालाजी शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. Kanthak Suryatal Post Views: 13 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बाबुराव लक्ष्मण हातागळे यांचे दुःखद निधन