नांदेड – प्रणव रामेश्वर मेंडके, वय-14 वर्षे, छत्रपती चौक नांदेड येथून दि.5 ऑक्टोबर 2026 रोजी हरवला असून तो कोणास आढळून आल्यास, माहिती माहिती असल्यास, दिसून आल्यास तात्काळ माहिती कळविण्याचे आवाहन त्यांच्या पालकांनी केले आहे. मिसींगची तक्रार भाग्यनगर पोलीस ठाण्यात नोंद असून पोलीस प्रशासन शोध घेत आहे. प्रणव मेंडके हा मुळचा आमदरीवाडी ता.भोकर जि.नांदेड येथील रहिवाशी आहे. सध्या शिक्षणासाठी नांदेड शहरातील छत्रपती चौक नांदेड येथे वास्तव्यास होता. प्रणव मेंडके हा कोणासही काहीही न सांगता निघून गेला आहे. प्रविण मेंडके हा वयाचे 14 वर्षाचा आहे. रंग-सावळा, चेहरा गोल, भाषा मराठी, हिंदी, उंची अंदाजे 5 फुट या वर्णनाचा मुलगा कोणास आढळून आल्यास, काहीही माहिती असल्यास त्यांनी 9168676715, 9960590661 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या घरच्यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 155 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मानसिक आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला; रुग्णांचे अनुभव सहानुभूतीने ऐका! दिल्लीत खाकीचा तांडव अन् शाहंचे खाजगी गुंडे! – सर्वोच्च न्यायालयात रविवारी आणीबाणी सुनावणी; UN कडून केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय नाचक्की!