चौघांवर गुन्हा दाखल; १ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त किनवट (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत किनवट पोलिसांनी घोटी फाटा परिसरात तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून चौघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, दोन मोटारसायकली, मोबाईल फोन आणि बदकछाप पत्ते असा एकूण १ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २ ऑक्टोबर रोजी किनवट पोलिसांना घोटी फाटा ते मलकापूर खेरडा रोडलगत कदम यांच्या शेतामध्ये काही व्यक्ती पैशांवर तिर्रट जुगार खेळत व खेळवत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला. यावेळी १) अभिजित ऊर्फ राजु राम कन्हाळे (वय ३८, रा. कमठाला) २) बालाजी गोविंद राठोड (वय ३६, रा. सरदार नगर, किनवट) ३) मारोती पिराजी कदम (वय ३९, रा. घोटी) ४) प्रभाकर गोविंद शिंदे (वय ३५, रा. लक्कडकोड) हे तिर्रट जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले. पोलिसांनी आरोपींच्या अंगझडती व घटनास्थळावरून ४७ हजार ६०० रुपये रोख, अंदाजे ६० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली, सुमारे ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन तसेच बदकछाप पत्ते असा एकूण १ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गु.र.नं. २८७/२०२६, कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटी, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार व पोलिस अंमलदार आशीष डगवाल, पुरी, डुकरे यांनी केली. अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून, अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 115 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation येरगी ग्रामसभेत व रिफॉर्म उत्सवात केंद्रीय सहसचिव पी. नरहरी यांचा सहभाग;ग्रामस्थांशी संवाद साधत शाश्वत ग्रामविकासासाठी केले मार्गदर्शन